जिल्हा

उपचाराअभावी सर्पदंशग्रस्त मुलाचा मृत्यू

उपचाराअभावी सर्पदंशग्रस्त मुलाचा मृत्यू
उपचाराअभावी सर्पदंशग्रस्त मुलाचा मृत्यू फोटो: ठाणे वैभव
शहापूर उपजिल्हा रुग्णालयातील असुविधा चव्हाट्यावर शहापूर : क्रिकेट खेळत असताना १४ वर्षीय मुलाला सर्पदंश झाला.या मुलाला उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले.मात्र त्याच्यावर उपचार करण्यात दिरंगाई करण्यात आली. वेळेवर उपचार न मिळाल्याने अखेर या मुलाचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. शहापूर तालुक्यातील पेंढरघोळ येथील प्रेम सदगीर (१४) असे घटनेत मृत झालेल्या मुलाचे नाव आहे. प्रेम हा काल संध्याकाळी पाचच्या सुमारास मुलांसोबत क़िकेट खेळत होता. चेंडू लांब गेल्याने तो चेंडू आणण्यासाठी गेला असता त्याला विषारी सापाने दंश केला. दंश झाल्याचे लक्षात येताच तो घरी गेला. यानंतर लगेच त्याला शहापूर येथील उपजिल्हा रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र तज्ञ व माहीतीगार डॉक्टर नसल्याने केवळ रक्त तपासणीच्या आधारावर या १४ वर्षीय बालकावर एक तास कोणतेही उपचार न केल्याने अखेर त्याचा बेडवर मृत्यू झाला. तो जीवंत असताना पालकांनी उपचारासाठी खूप विनंती केली. मात्र कोणीही त्याचा विनंतीकडे लक्ष दिले नसल्याचे नातेवाईकांचे म्हणणे आहे. दरम्यान शहापूर हा आदिवासी बहुल तालुका असून येथील उपजिल्हा रुग्णालयात पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नसणे, रुग्ण व नातेवाईकांसाठी फॅनची व्यवस्था नसणे, अनेक रिक्त पदे न भरणे, प्रसूतीगृहात सुविधांचा अभाव असणे अशा अनेक त्रुटींवर वर्तमान पत्रातून वस्तुस्थिती मांडली जाते. मात्र तालुक्यात खंबीर नेतृत्व नसल्याने याकडे दुर्लक्ष होत आहे. तीन दिवसांपूर्वी माझ्या गावातील आदिवासी महिलेस सर्पदंश झाल्यामुळे तिला सरकारी दवाखान्यामध्ये आणले, परंतु या ठिकाणी सुद्धा उपचार झाले नाहीत. तिला तत्काळ पुढे न्या असे सांगण्यात आले. दवाखान्याची रुग्णवाहिका सेवाही नाही, आम्ही तत्काळ महिलेला ठाणे सिव्हिल रुग्णालयात नेले, त्यामुळे त्या महिलेचा जीव वाचला, असे खैरे-सारंगपुरी सरपंच नारायण दरोडा यांनी सांगितले.

संबंधित बातम्या

Advertisement ADVERTISEMENT 300x475

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
Advertisement ADVERTISEMENT 300x475