जिल्हा
कचोरे परिसरात माती खचल्याने घरांचे नुकसान
कचोरे परिसरात माती खचल्याने घरांचे नुकसान
फोटो: ठाणे वैभव
कल्याण : कल्याण पूर्वेतील कचोरे परिसरात माती खचल्याने पाच ते सहा घराचे नुकसान झाल्याची घटना रविवारी सकाळी घडली. सुदैवाने यामध्ये जीवितहानी झाली नाही.
प्राप्त माहितीनुसार गेल्या दोन दिवसांपासून सातत्याने सुरू असलेल्या पावसामुळे कचोरे येथील टेकडीवजा परिसरातील संदर्भीत चाळीतील घराच्या मागच्या बाजूच्या ठिकाणची माती खचल्याने पाच ते सहा घरांचे नुकसान झाले. दक्षता घेत लोकांचे स्थलांतर झाल्याने सुदैवाने यात कोणतही जीवितहानी झाली नाही.
कडोंमपाच्या एफ वॉर्डच्या सहाय्यक आयुक्त हेमा मुबंरकर यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी सांगितले की, फ प्रभाग आणि जे प्रभाग या दोन्ही प्रभागाच्या बॉर्डरवर असलेला कचोरे गाव येथील टेकडीवर असलेल्या चाळी अथवा जिथे माती भूस्खलन होऊ शकते अशा ठिकाणची घरं पावसाळ्यापूर्वीच निर्मनुष्य करून घेण्यात आली होती. त्यातील एका चाळीच्या घराची भिंत आणि लगतची माती खचत असल्याचे गावकऱ्यांना दिसल्यामुळे त्यांनी हा भाग तोडून घेतला आणि धोकाही टाळण्यात आला.
ADVERTISEMENT 300x475
ADVERTISEMENT 300x475