जिल्हा

लाच प्रकरणी नायब तहसीलदारावर गुन्हा

लाच प्रकरणी नायब तहसीलदारावर गुन्हा
लाच प्रकरणी नायब तहसीलदारावर गुन्हा फोटो: ठाणे वैभव
ठाणे: सातबारावरील नाव बदली करण्यासाठी मदतनीसामार्फत २५ हजारांची लाच मागणाऱ्या शहापूर येथिल नायब तहसीलदार यांच्या विरोधात शहापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दत्तात्रय बांबळे असे नायब तहसीलदार यांचे नाव आहे. ते शहापूर येथिल तहसीलदार कार्यालयात कार्यरत आहेत. जीवदानी संस्था विरार यांची वाशाळा आणि वेळूक या ठिकाणी जमिन आहे. या जमिनीच्या सात बारा उताऱ्यावर असलेल्या संचालकांची नावे बदली करण्यासाठी तक्रारदार यांनी मार्च महिन्यात अर्ज दाखल केला होता. या अर्जावर कारवाई करताना नायब तहसीलदार यांनी त्यांच्या मदतनीसामार्फत २५ हजार लाच मागितली होती. त्याबाबत पालघर येथे तक्रारदार यांनी तक्रार केली होती. या तक्रारीबाबत पुन्हा एकदा पंचासमक्ष ठाण्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने काल पडताळणी केली असता नायब तहसीलदार यांनी २५ हजारांची लाच मागितल्याचे स्पष्ट झाल्याने त्यांच्या विरोधात शहापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे परंतु त्यांना अटक करण्यात आली नाही. या गुन्ह्याचा पुढील तपास सुरू आहे.

संबंधित बातम्या

Advertisement ADVERTISEMENT 300x475

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
Advertisement ADVERTISEMENT 300x475