जिल्हा
नगरसेवक रमेश म्हात्रेंना न्यायालयीन कोठडी
नगरसेवक रमेश म्हात्रेंना न्यायालयीन कोठडी
फोटो: ठाणे वैभव
कल्याण: डोंबिवली डॉक्टर मारहाण प्रकरणी मुख्य आरोपी नगरसेवक रमेश म्हात्रेंना 24 जुलैपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली असून त्यांच्या जामीन अर्जावर आज सुनावणी होणार आहे.
डोंबिवलीतील शास्त्री नगर रुग्णालयात डॉक्टर मारहाण प्रकरणातील अटकेत असलेले मुख्य आरोपी शिवसेना नगरसेवक रमेश म्हात्रे यासह इतर तीन आरोपींना आज न्यायालयात सुनावणीसाठी हजर करण्यात येणार होते. मात्र पहिल्या सुनावणी दिवशी वकील आणि पोलीस यामध्ये झालेल्या वादानंतर आज वकिलांनी लाल फिती बांधून पोलिसांचा निषेध केला.
या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी रमेश म्हात्रेसह तीन आरोपींना न्यायालयात हजर न करता व्हिडिओ कॉन्फन्सिंगद्वारे सुनावणी घेण्यात आली. या सुनावणीत आरोपींना २४ तारखेपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. याचदरम्यान आरोपींच्या वतीने जामीनासाठी अर्ज करण्यात आला असून मात्र या अर्जावर सोमवारी सुनावणी होऊ शकली नाही. त्यामुळे या अर्जावर आज सुनावणी होणार असून न्यायालय काय निर्णय घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
ADVERTISEMENT 300x475
ADVERTISEMENT 300x475