जिल्हा

तरणतलाव-जिमचे बांधकाम रद्द; ३२६७ झाडांना मिळाले जीवदान

तरणतलाव-जिमचे बांधकाम रद्द; ३२६७ झाडांना मिळाले जीवदान
तरणतलाव-जिमचे बांधकाम रद्द; ३२६७ झाडांना मिळाले जीवदान फोटो: ठाणे वैभव
भाईंदर: 'ठाणेवैभव' मध्ये प्रकाशित झालेल्या बातमीचे तीव्र पडसाद मीरा-भाईंदर शहरातील पर्यावरण प्रेमींसह नागरिक आणि राजकीय वर्तुळात उमटले. महापालिका प्रशासनाने त्याची तत्काळ दखल घेऊन तरणतलाव आणि जिम्नॅशिअम बांधण्याचा निर्णय रद्द केल्याचे प्रसिद्धी माध्यमांना कळविले आहे. त्यामुळे ३२६७ झाडांना जीवदान मिळाले आहे. मीरा-भाईंदर महानगरपालिका क्षेत्रात महाराष्ट्र शासनाच्या मुलभूत सोयी सुविधा निधी अंतर्गत भाईंदर (पू. ) प्रभाग क्र 12 मधील आरक्षण क्र. 230 उद्यानाच्या भूखंडावर ऑलम्पिक साईज तरण तलाव आणि जिम्नॅशिअम बांधणे कामी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या पत्रान्वये बाधित 3267 झाडे मुळासहित काढून पुनरोपण करणेकामी 23 ऑक्टोबर 2023 रोजी जाहिर नोटीस सूचना वृत्तपत्रात प्रसिध्द करून सूचना व हरकती मागविण्यात आलेल्या होत्या. ठाणेवैभव ने याबाबतचे वृत्त प्रकाशित केल्यानंतर शहरात तीव्र पडसाद उमटले. या प्रकरणी विविध पर्यावरण प्रेमी, नागरिक, सामाजिक संघटना यांनी लोकप्रतिनिधी आणि महानगरपालिकेकडे लेखी आणि तोंडी तीव्र आक्षेप नोंदविले. अखेर महापालिकेमार्फत आरक्षण क्र. 230 येथे होणारे तरण तलाव आणि जिम्नॅशिअम कामाचे ठिकाण बदलून अन्य जागा निश्चित करून तरण तलाव बांधण्यात येईल, असे जनसंपर्क अधिकारी राजकुमार घरत यांचेकडून लेखी पत्राद्वारे कळविण्यात आले आहे. या निर्णयामुळे हजारो झाडांना जीवदान मिळाले असून पर्यावरणप्रेमी आणि नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.

संबंधित बातम्या

Advertisement ADVERTISEMENT 300x475

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
Advertisement ADVERTISEMENT 300x475