जिल्हा

नालेसफाईतील हलगर्जीपणाचा फटका

नालेसफाईतील हलगर्जीपणाचा फटका
नालेसफाईतील हलगर्जीपणाचा फटका फोटो: ठाणे वैभव
कळव्यात घरांमध्ये पाणी, काँग्रेसचा प्रशासनावर हल्लाबोल ठाणे : ठाणे महापालिकेच्या नालेसफाईतील कथित निष्काळजीपणा आणि ठेकेदारांच्या मुजोरीमुळे कळवा येथील साईनाथ नगर, शनी मंदिर परिसरातील नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. मुसळधार पावसामुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरल्यानंतर नाल्यातील गाळ काढण्यासाठी महापालिकेच्या आपत्कालीन यंत्रणेला पाचारण करावे लागल्याने काँग्रेसने प्रशासनावर जोरदार टीका करत उच्चस्तरीय चौकशीची मागणी केली आहे. काँग्रेसच्या आरोपानुसार, पावसाळ्यापूर्वी नालेसफाई करून नाल्यांचा पाण्याचा प्रवाह सुरळीत ठेवणे ही संबंधित ठेकेदाराची करारानुसार जबाबदारी आहे. मात्र हे काम वेळेत पूर्ण न झाल्याने मुसळधार पावसात नाल्यांमध्ये मोठ्या प्रमाणात गाळ साचला. परिणामी परिसरातील अनेक घरांमध्ये पाणी शिरून नागरिकांचे नुकसान झाले. नागरिकांच्या तक्रारीनंतर महापालिकेची आपत्कालीन यंत्रणा घटनास्थळी दाखल होऊन नाल्यातील गाळ काढण्याचे काम हाती घेतले. संबंधित ठेकेदाराने "आज रविवार असल्याने आम्हाला सुट्टी आहे," अशी भूमिका घेतल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. त्यामुळे नालेसफाईची कोट्यवधी रुपयांची बिले ठेकेदारांनी घ्यायची आणि प्रत्यक्ष काम मात्र महापालिकेच्या कर्मचाऱ्यांकडून करून घ्यायचे का, असा सवाल काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष राहुल पिंगळे यांनी उपस्थित केला. या संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून संबंधित ठेकेदारांची बिले रोखावीत, त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करावी तसेच जबाबदार अधिकाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्यात यावी, अशी मागणी काँग्रेसने केली आहे. मागण्यांकडे दुर्लक्ष झाल्यास नागरिकांना सोबत घेऊन तीव्र जनआंदोलन छेडण्याचा इशाराही काँग्रेसने दिला आहे. दरम्यान, नालेसफाईच्या कामांवर दरवर्षी कोट्यवधी रुपये खर्च होत असतानाही प्रत्येक पावसाळ्यात शहरात पाणी तुंबणे आणि नागरिकांच्या घरांमध्ये पाणी शिरण्याच्या घटना घडत असल्याने महापालिकेच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. "नालेसफाईच्या कामांवर कोट्यवधी रुपये खर्च होत असतानाही प्रत्येक पावसाळ्यात शहरात पाणी तुंबणे आणि नागरिकांच्या घरात पाणी शिरणे, ही प्रशासनाच्या नियोजनशून्य कारभाराची साक्ष आहे," असा आरोप ठाणे काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष राहुल पिंगळे यांनी केला आहे.

संबंधित बातम्या

Advertisement ADVERTISEMENT 300x475

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
Advertisement ADVERTISEMENT 300x475