जिल्हा

अंबरनाथला इंधन दरवाढीविरोधात काँग्रेसचे आंदोलन

अंबरनाथला इंधन दरवाढीविरोधात काँग्रेसचे आंदोलन
अंबरनाथला इंधन दरवाढीविरोधात काँग्रेसचे आंदोलन फोटो: ठाणे वैभव
अंबरनाथ: इंधन दरवाढ, इंधन टंचाईच्या तसेच वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर अंबरनाथमध्ये काँग्रेसतर्फे आंदोलन करण्यात आले. ठाणे जिल्हा ग्रामीण काँग्रेस जिल्हाध्यक्ष चेतन पवार यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारविरोधात करण्यात आलेल्या आंदोलनात काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी करत केंद्र सरकारच्या धोरणांचा निषेध व्यक्त केला. एका पेट्रोलपंपावर नागरिकांना ‘मेलोडी’ चॉकलेट वाटून आगळ्यावेगळ्या पद्धतीने निषेध नोंदवला. तसेच अंबरनाथ तहसीलदार कार्यालयासमोर एलपीजी सिलेंडर ठेवून केंद्र सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. त्यानंतर विविध मागण्यांचे निवेदन तहसीलदार कार्यालयात सादर करण्यात आले. कोकण ओबीसी समन्वयक शंभू म्हात्रे, ठाणे ओबीसी जिल्हाध्यक्ष तुषार देसले यांच्यासह शहरातील अनेक पदाधिकारी, महिला पदाधिकारी आणि कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले होते.

संबंधित बातम्या

Advertisement ADVERTISEMENT 300x475

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
Advertisement ADVERTISEMENT 300x475