जिल्हा

काँग्रेसला संविधानावर बोलण्याचा अधिकार नाही

काँग्रेसला संविधानावर बोलण्याचा अधिकार नाही
काँग्रेसला संविधानावर बोलण्याचा अधिकार नाही फोटो: ठाणे वैभव
काँग्रेसने डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा अवमान केला-किरेन रिजिजु ठाणे: भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा घोर अवमान करणाऱ्या काँग्रेस आणि राहुल गांधी यांना बाबासाहेबांच्या संविधानावर बोलण्याचा अधिकार नाही, असे वक्तव्य केंद्रीय अल्पसंख्यांक तथा संसदिय कामकाज मंत्री किरेन रिजिजु यांनी केले असून त्यावेळी बाबासाहेबांना दिलेल्या हीन वागणुकीचे अनेक दाखले देत त्यांनी काँग्रेसचा पर्दाफाश केला. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस मविआ आघाडीची पोलखोल करण्यासाठी ठाण्यात भाजप मिडिया सेंटरमध्ये आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत रिजिजु बोलत होते. याप्रसंगी, खासदार नरेश म्हस्के, भाजप ठाणे शहर जिल्हाध्यक्ष संजय वाघुले, भाजप प्रदेश प्रवक्ते सागर भदे, माजी नगरसेविका मृणाल पेंडसे, रिपाईचे भास्कर वाघमारे आदीसह महायुतीचे अनेक नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. महाराष्ट्रात महायुतीसाठी उत्तम वातावरण असल्याचे सांगुन केंद्रीय मंत्री रिजिजु यांनी, राहुल गांधींनी नागपुर येथील कार्यक्रमात संविधानाच्या नावाखाली कोऱ्या लाल रंगाच्या पुस्तिकेचे ढोंग रचल्याचे सांगितले. राहुल गांधी आणि काँग्रेसने नेहमीच बाबासाहेब आंबेडकरांना अपमानित केले. त्यामुळेच १९५१ साली बाबासाहेबांनी कायदा मंत्री पदाचा राजीनामा दिला. त्यानंतर संविधानात देखील काँग्रेसने बदल केले. हा संविधानावरील पहिला हल्ला होता. १९७५ मध्ये आणीबाणी लागु करून संविधानाचा पायाच काँग्रेसने उद्ध्वस्त केला. १९९० मध्ये काँग्रेसचे सरकार सत्तेतून पायउतार झाल्यावर आलेल्या सरकारने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना भारतरत्न देण्याचा निर्णय घेतला, त्यात भाजपचाही समावेश होता. तर दुसरीकडे २६ नोव्हेंबर रोजी संविधान दिन साजरा करून तसेच देशभरात संविधान मंदिरे उभारून भाजप संविधानाचा सन्मान करीत आहे. आणि, काँग्रेस केवळ संविधान बदलण्याचा बागुलबुवा उभा करून देशात फेक नॅरेटीव्ह पसरवत असल्याचे मंत्री रिजिजु यांनी सांगितले. नरेंद्र मोदी पंतप्रधान बनल्यानंतर जगात देशाची प्रतिमा उंचावली. महाराष्ट्रात २०१४ नंतर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री बनल्यानंतर बदल झाला. त्यांच्या नेतृत्वाखाली मुंबई ते नागपूर समृद्धी महामार्ग हा जागतिक दर्जाचा महामार्ग उभारला आहे. राज्यात लाडकी बहिणसारख्या योजना लोकप्रिय होत आहेत. देशाला पुढे नेण्यासाठी महाराष्ट्र एक प्रकारे डबल इंजिनचे काम करीत आहे. तेव्हा, हा विकास अधिक वेगाने पुढे नेण्याची संधी या निवडणुकीच्या निमित्ताने आली असून जातीजातीत विभागले जाऊ नका, असे आवाहन मंत्री रिजिजु यांनी केले.

संबंधित बातम्या

Advertisement ADVERTISEMENT 300x475

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
Advertisement ADVERTISEMENT 300x475