जिल्हा

पोलिसांकडून ४७३४ परवानाधारक शस्त्रे जमा

पोलिसांकडून ४७३४ परवानाधारक शस्त्रे जमा
पोलिसांकडून ४७३४ परवानाधारक शस्त्रे जमा फोटो: ठाणे वैभव
ठाणे : विधानसभेची निवडणूक निर्भयपणे पार पडावी यासाठी पोलीस प्रशासनाकडून ४७३४ परवानाधारक शस्त्रे जमा करण्यात आली आहेत. कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी पोलिसांकडून ही कार्यवाही करण्यात आली असून उर्वरित परवाना शस्त्रे जमा करण्याची कार्यवाही सुरु असल्याची माहिती पोलिसांच्या वतीने देण्यात आली आहे. ठाणे जिल्ह्यात एकूण ६,३९१ शस्त्र परवानाधारक आहेत. त्यापैकी, ४,७३४ शस्त्रास्त्रे जमा करण्यात आली आहेत. तर अद्याप ३५३ शस्त्रे जमा करणे बाकी असल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणुक अधिकारी अशोक शिनगारे यांनी दिली. ३९४४ व्यक्तीवर कारवाई करण्यात आली असून अटकेचे वॉरंट बजावण्यात आले आहे. ठाणे जिल्ह्यात अतिसंवेदनशील मतदार केंद्र नसून निवडणुकीसाठी दहा हजार पोलिसांची आवश्यकता आहे. यावेळी सह पोलीस आयुक्त दत्ता शिंदे, डॉ. ज्ञानेश्वर चव्हाण, पोलिस अधीक्षक डॉ. डी. स्वामी हे उपस्थित होते. ठाणे शहर आणि ग्रामीण पोलीस क्षेत्रातील सर्व शस्त्र परवानाधारकांची शस्त्रे जमा करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार,बँका, महत्वाची कार्यालये, संस्था, विद्युत केंद्र, सराफी केंद्रे व इतर महत्वाच्या कार्यालयाचे शस्त्र वगळून सर्व परवानाधारक शस्त्रे जमा करण्याचे कडक आदेश संबंधित झोनच्या पोलीस उपायुक्तांना देण्यात आले असून शस्त्रे जमा करण्याची कारवाई सुरू आहे. ५४ शस्त्र धारकांचे परवाने रद्द ठाणे जिल्ह्यात एकूण ७,३९१ शस्त्र परवानाधारक आहेत. त्यापैकी, ४,७३४ शस्त्रास्त्रे जमा करण्यात आली आहेत. पोलीस अहवालातील वादग्रस्त असलेल्या ५४ शस्त्र धारकांचे परवाने रद्द करण्यात आले आहेत. तर अद्याप ३५३ शस्त्रे जमा करणे बाकी असल्याची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयाकडून देण्यात आली आहे.

संबंधित बातम्या

Advertisement ADVERTISEMENT 300x475

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
Advertisement ADVERTISEMENT 300x475