जिल्हा

कोचिंग क्लासेस संघटना कोकण पदवीधर निवडणुकीच्या रिंगणात

कोचिंग क्लासेस संघटना कोकण पदवीधर निवडणुकीच्या रिंगणात
कोचिंग क्लासेस संघटना कोकण पदवीधर निवडणुकीच्या रिंगणात फोटो: ठाणे वैभव
कोचिंग क्लासेस संघटना कोकण पदवीधर निवडणुकीच्या रिंगणात ठाणे: शासन पातळीवर होत असलेल्या दुर्लक्षाच्या निषेधार्थ कोचिंग क्लासेसचे शिक्षक उतरले आहेत. कोचिंग क्लासेस संचालक संघटनेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत केलेल्या ठरावानुसार, आगामी कोकण पदवीधर मतदारसंघ निवडणुकीत संघटनेचा उमेदवार रिंगणात उतरविण्यात येणार आहे. अशी माहिती बुधवारी ठाण्यात आयोजित पत्रकार परिषदेत देण्यात आली. शालेय शिक्षण व्यवस्थेला पूरक अशी शैक्षणिक संस्था असलेल्या कोचिंग क्लासेस संचालक संघटनेने आता कोकण पदवीधर निवडणुकीसाठी दंड थोपटले आहेत. यावेळी संघटनेचे अध्यक्ष सतिश देशमुख यांच्या हस्ते उदघाटन करण्यात आले. यावेळी बोलताना सचिन सरोदे म्हा आले, ''गेल्या १४ वर्षांपासून महाराष्ट्रातील क्लासेस संचालक म्हणजेच खाजगी शिक्षक यांच्या न्याय हक्कासाठी संघटना काम करत आहे. शालेय शिक्षण व्यवस्था कमकुवत होत असताना शिक्षकांसह विद्यार्थ्याच्या हितासाठी ही संघटना कार्यरत आहे. अनेक डॉक्टर, वकील, इंजिनियर घडवण्यात याच क्लासेसचा वाटा आहे. या पार्श्वभूमीवर या क्षेत्राच्या विकासासंदर्भात शासनाकडे पत्रव्यवहार करूनही दखल घेतली गेली नसल्याने कोचिंग क्लासेस संघटना संतप्त झाल्या आहेत. आम्हाला शासनाकडे मिळत नसलेली दाद आणि वेळोवेळी होणारा आमचा अपमान याचा समाचार घेण्याचा निर्धार केला. विविध राजकीय नेत्यांकडून कोचिंग क्लासेसबाबत आक्षेपार्ह विधाने केली जात आहेत. या राज्यात केवळ सुशिक्षित पदवीधर निर्माण होत आहेत परंतु त्यांच्या रोजगाराबाबत कोणीही बोलत नाही. पदवीधरांच्या समस्यांबाबतही कोणताही विचार केला जात नाही. याच गोष्टीचा विचार करता, नुकत्याच पार पडलेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत, पुढच्या वर्षी होणाऱ्या कोकण पदवीधर निवडणूकीमध्ये संघटनेचा उमेदवार देऊन तो निवडून आणण्यासाठीचा ठराव एकमताने संमत करण्यात आला आहे. यासाठी आतापर्यत पाच हजार पदवीधर मतदारांची नोंदणी पूर्ण केली असून येत्या काळात ४० हजार नोंदणी करण्याचा मानस संघटनेने व्यक्त केला आहे..मतदार नोंदणी यशस्वी झाल्यानंतर संघटनेचा उमेदवार घोषित करण्यात येईल."

संबंधित बातम्या

Advertisement ADVERTISEMENT 300x475

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
Advertisement ADVERTISEMENT 300x475