जिल्हा
वाहनचालक आणि वाहतूक पोलिसाची भररस्त्यात हाणामारी
वाहनचालक आणि वाहतूक पोलिसाची भररस्त्यात हाणामारी
फोटो: ठाणे वैभव
कल्याण : कल्याण-नगर राष्ट्रीय महामार्गाच्या शहाड उड्डाणपुलाजवळ काल मध्यरात्रीच्या सुमारास वाहनांची भीषण वाहतूक कोंडी झाली. रस्त्यावरील वाहनांची वाहतूक कोंडी सोडवताना वाहतूक पोलिस आणि वाहनचालकामध्ये चक्क रस्त्यावरच जोरदार हाणामारी झाली.
वाहतूक पोलिसाकडून शिवीगाळ आणि मारहाणीनंतर वाहतूक कोंडीत अडकलेल्या संतप्त वाहनचालकाने प्रतिउत्तर देत भर रस्त्यात वाहतूक पोलिसाला मारहाण केली. तब्बल अर्धा तास राडा सुरू असल्याने परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. अखेर इतर वाहनचालकांनी हस्तक्षेप करत वाद मिटवला. या हाणामारीचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे. यासंदर्भात महात्मा फुले स्टेशनमध्ये गुन्हा दाखल असल्याचे समजते.
ADVERTISEMENT 300x475
ADVERTISEMENT 300x475