जिल्हा

स्वातंत्र्यदिनी सिडकोची ४,७७९ सदनिकांसाठी सोडत

स्वातंत्र्यदिनी सिडकोची ४,७७९ सदनिकांसाठी सोडत
स्वातंत्र्यदिनी सिडकोची ४,७७९ सदनिकांसाठी सोडत फोटो: ठाणे वैभव
आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी गृहनिर्माण योजना नवी मुंबई : सिडको महामंडळातर्फे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी (ईडब्ल्यूएस) ४,७७९ सदनिकांची नवीन गृहनिर्माण योजना जाहीर करण्यात आली आहे. येत्या शनिवार १५ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता www.cidcohomes.com या पोर्टलवर ऑनलाइन नोंदणी सुरू होईल. या योजने अंतर्गत तळोजा सेक्टर-३९ येथे ४,२२९, कळंबोली बस डेपो येथे २५७ आणि खारघर बस डेपो येथे २९३ सदनिका उपलब्ध आहेत. योजनेतील काही सदनिका दिव्यांग अर्जदारांसाठी राखीव आहेत. तळोजा, कळंबोली व खारघर हे नोड्स विस्तृत रस्ते जाळे, रेल्वे-मेट्रो सुविधा व नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या समीपतेमुळे उत्तम दळणवळणाने जोडलेले आहेत. सदनिकांचे वाटप हे पात्रता पडताळणी, कागदपत्रांची छाननी व योजनेच्या अटी-शर्तींच्या पूर्ततेच्या अधीन राहील. अद्ययावत माहितीसाठी अर्जदारांनी www.cidcohomes.com या संकेतस्थळास भेट देण्याचे आवाहन सिडको मार्फत करण्यात आले आहे. तसेच प्रत्येक प्रकल्पाची सदनिकानिहाय किंमत व सर्व इतर शुल्क नोंदणी सुरू होण्यापूर्वी पोर्टलवर प्रसिद्ध करण्यात येईल. वार्षिक कौटुंबिक उत्पन्न सहा लाखांपर्यंत असलेले व भारतात कुठेही पक्के घर नसलेले अर्जदार या योजनेसाठी पात्र आहेत; सविस्तर पात्रता निकष व अटी पोर्टलवर उपलब्ध असण्याचे सिडकोमार्फत सांगण्यात आले आहे.

संबंधित बातम्या

Advertisement ADVERTISEMENT 300x475

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
Advertisement ADVERTISEMENT 300x475