जिल्हा

अष्टविनायक चौकात प्रथमच फुटणार चोर दहीहंडी

अष्टविनायक चौकात प्रथमच फुटणार चोर दहीहंडी
अष्टविनायक चौकात प्रथमच फुटणार चोर दहीहंडी फोटो: ठाणे वैभव
ठाणे : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे ठाणे शहरात प्रथमच चोर दहीहंडीचे आयोजन करण्यात आले आहे. ठाणे पूर्वभागातील मनसेचे शाखाध्यक्ष विनायक बिटला आयोजित या चोरहंडीचा थरार ३ सप्टेंबर रोजी सायंकाळी ५ ते १० वाजेदरम्यान अष्टविनायक चौकात रंगणार आहे. या चोर दहीहंडीत सहभागी होणाऱ्या गोविंदा पथकांना त्यांच्या कामगिरीनुसार रोख बक्षिसे देऊन गौरवण्यात येणार आहे. दहीहंडी दरम्यान सुमारे ७५ हजाराहून अधिक रकमेची बक्षिसे वितरित केली जाणार आहेत. सहभागी गोविंदा पथकांना प्रोत्साहित करण्यासाठी ठाणे-पालघर जिल्हाध्यक्ष आणि मनसे नेते अविनाश जाधव, मनसे नेते अभिजित पानसे, ठाणे शहराध्यक्ष रवींद्र मोरे आणि जय जवान गोविंदा पथकाचे प्रमुख संदीप ढवळे उपस्थित राहणार आहेत. प्रथम येणाऱ्यास प्राधान्य दिले जाणार आहे, त्यामुळे गोविंदा पथकांनी चोर दहीहंडीत सहभागी होण्यासाठी गणेश परब (८१६९३४५४८७) किंवा अथर्व सातकर (८१०८५४०६१८) यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

संबंधित बातम्या

Advertisement ADVERTISEMENT 300x475

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
Advertisement ADVERTISEMENT 300x475