जिल्हा

ठाण्यात शॉक लागून बालकाचा मृत्यू

ठाण्यात शॉक लागून बालकाचा मृत्यू
ठाण्यात शॉक लागून बालकाचा मृत्यू फोटो: ठाणे वैभव
ठाणे: ठाणे महापालिकेच्या विद्युत विभागाच्या स्ट्रीट पोलमधून केबल टाकून विजेची चोरी केलेल्या वायरीचा शॉक लागून कळवा पूर्व, शिवाजी नगर येथील मंदार गौरी या १७ वर्षीय बालकाचा मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी रात्री आठ ते सव्वा आठ वाजण्याच्या सुमारास समोर आली. उपचारार्थ रुग्णालयात नेल्यावर तेथील डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. मंदार हा त्या परिसरातून जाताना हा प्रकार घडला. त्याला तातडीने उपचारासाठी स्थानिकांनी कळवा, छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले, अशी माहिती आपत्ती व्यवस्थापन कक्षाने दिली.

संबंधित बातम्या

Advertisement ADVERTISEMENT 300x475

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
Advertisement ADVERTISEMENT 300x475