जिल्हा

प्रदूषणमुक्त सण साजरे करा - आयुक्त

प्रदूषणमुक्त सण साजरे करा - आयुक्त
प्रदूषणमुक्त सण साजरे करा - आयुक्त फोटो: ठाणे वैभव
ठाणे: राष्ट्रीय हरित लवादाच्या आदेशानुसार ठाणे महापालिका क्षेत्रात केवळ हरित फटाके वाजवण्याची परवानगी आहे. त्यामुळे नागरिकांनी त्याचे पालन करून प्रदूषणमुक्त दिवाळी साजरी करावी, असे आवाहन ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी केले आहे. सर्व ठाणेकरांना सणाच्या निमित्ताने शुभेच्छा देतानाच आरोग्याची खबरदारी घेण्याचेही आवाहन राव यांनी केले आहे. सणांच्या काळात सकाळी ६ ते ८ आणि रात्री ८ ते १० या काळात हरित फटाके फोडण्याची परवानगी आहे. प्रदूषणमुक्त सण साजरा करून नागरिकांनी स्वत:सोबतच प्राणी, पक्षी, झाडे यांचाही फटाक्यांच्या दुष्परिणामांपासून बचाव करावा, असे आयुक्त राव यांनी म्हटले आहे. या संदर्भातील आवाहन करणारे जनजागृती फलकही महापालिका क्षेत्रात प्रर्दशित करण्यात आले आहेत. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार नागरिकांनी हरित फटाके फोडताना काळजी घ्यावी. फटाके फोडताना, सिंथेटीक कपड्यांएेवजी सूती कपडे परिधान करावेत. मोकळ्या जागेत फटाके फोडावेत. फटाके फोडताना पाणी आणि वाळू यांचा साठा जवळपास ठेवावा. फटाके फोडताना लहान मुलांकडे विशेष लक्ष द्यावे. तसेच, ज्येष्ठ नागरिक, रुग्ण यांना त्रास होणार नाही, याची काळजी घ्यावी. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने दिलेल्या सूचनांनुसार नागरिकांनी जबाबदारीने फटाके फोडावेत, असे आवाहन महापालिकेच्या पर्यावरण विभागाने केले आहे. दिवाळीची सुटी लक्षात घेऊन दैनंदिन साफसफाई, सार्वजनिक शौचालयांची सफाई, पाणी पुरवठा या व्यवस्था सुरळीत राहतील याची काळजी संबंधित विभागाने घ्यावी. नागरिकांची गैरसोय होणार नाही, याची दक्षता घेण्याचे निर्देश आयुक्त राव यांनी नुकत्याच झालेल्या आढावा बैठकीत दिले आहेत.

संबंधित बातम्या

Advertisement ADVERTISEMENT 300x475

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
Advertisement ADVERTISEMENT 300x475