जिल्हा
कोपरी पुलाजवळ कारला आग
कोपरी पुलाजवळ कारला आग
फोटो: ठाणे वैभव
ठाणे: मुंबई-नाशिक महामार्गावरील कोपरी पुलाजवळ शुक्रवारी सायंकाळी धावत्या कारला अचानक आग लागल्याने काही काळ खळबळ उडाली. मात्र, प्रसंगावधान राखत कोपरी वाहतूक शाखेने तातडीने घटनास्थळी धाव घेत वाहतूक नियंत्रणात ठेवल्याने मोठी वाहतूक कोंडी आणि संभाव्य अपघात टळले.
घटनेची माहिती मिळताच कोपरी वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक दिलीप पाटील यांनी आपल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांसह त्वरित घटनास्थळी धाव घेतली. आगीपासून सुरक्षित अंतर ठेवत वाहनांची योग्य दिशेने वळवणूक करण्यात आली. त्यामुळे नागरिकांची सुरक्षितता अबाधित राखत वाहतूक शक्य तितकी सुरळीत ठेवण्यात वाहतूक पोलिसांना यश आले.
ADVERTISEMENT 300x475
ADVERTISEMENT 300x475