जिल्हा
शहापूर मतदारसंघात दरोडा यांचा उमेदवारी अर्ज दाखल
शहापूर मतदारसंघात दरोडा यांचा उमेदवारी अर्ज दाखल
फोटो: ठाणे वैभव
शहापूर : विधानसभा निवडणुकीचे उमेदवारी अर्ज दाखल करायला सुरुवात झाली असून आज १३५-शहापूर (अ.ज.) विधानसभा मतदारसंघातून विधानसभेच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी पक्ष अजित पवार गटाचे उमेदवार आमदार दौलत दरोडा तसेच शर्मिला शेळके यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला.
विधानसभेच्या रणांगणात अनेक इच्छूक आपले नशीब अजमावण्याचा प्रयत्न करीत आहेत. राजकीय पक्षांकडून उमेदवारी जाहीर होऊ लागल्या असून राष्ट्रवादीमधून दौलत दरोडा तर मनसेकडून हॅरी खंडवी यांना पक्षांकडून अधिकृत उमेदवारी जाहीर झाली आहे. महाविकास आघाडीकडून अद्याप उमेदवार जाहीर झाला नसला तरी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे व राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटातील स्थानिक पदाधिकारी प्रचाराच्या कामाला लागले असल्याचे चित्र दिसून येत आहे.
प्रशासकीय पातळीवर निवडणुकीची संपूर्ण तयारी झाल्यामुळे इच्छुक उमेदवारांना विनाअडथळा उमेदवारी अर्ज दाखल करता येत आहेत.
ADVERTISEMENT 300x475
ADVERTISEMENT 300x475