जिल्हा
मविआचे उमेदवार सुभाष भोईर यांची १४ गावांत प्रचार रॅली
मविआचे उमेदवार सुभाष भोईर यांची १४ गावांत प्रचार रॅली
फोटो: ठाणे वैभव
ठाणे: १४४ कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीतर्फे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे अधिकृत उमेदवार सुभाष भोईर यांच्या निवडणूक प्रचाराची रॅली १४ गावातून काढण्यात आली.
यावेळी कल्याण डोंबिवली महानगरपालिका प्रभाग क्रमांक ४५ मधील प्रकाश चौधरी व प्रभाग समिती ४४ मधून व्यापारी संघटनेचे अध्यक्ष वसंत भानुशाली त्याचप्रमाणे बामाल्ली गावचे परशुराम गायकर यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात प्रवेश केला.
१४ गावातील बाळे, वडवली, नारीवली, वाकळण, बामाल्ली, निघू, नागाव या गावांमध्ये काढण्यात आलेल्या प्रचार रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यावेळी कॉंग्रेस पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश सचिव संतोष केणे, कॉंग्रेस पक्षाचे कल्याण ग्रामीण अध्यक्ष चंद्रकांत पाटील, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे माजी नगरसेवक हिरा पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य रमेश पाटील, विभागप्रमुख बाळाराम पाटील, हनुमान महाराज पाटील, वडवली गावचे अरुण पाटील, राम भोईर, माजी सरपंच परेश ठक्कर, विभाग संघटिका सपना यंदारकर, तसेच बळीशेठ पाटील, उपविभाग प्रमुख अशोक जाधव यांच्यासह सर्व शाखाप्रमुख, पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
ADVERTISEMENT 300x475
ADVERTISEMENT 300x475