महाराष्ट्र

बायपासचा कठडा तोडून सिमेंट मिक्सर रहिवासी संकुलात

बायपासचा कठडा तोडून सिमेंट मिक्सर रहिवासी संकुलात
बायपासचा कठडा तोडून सिमेंट मिक्सर रहिवासी संकुलात फोटो: ठाणे वैभव
अपघातात एकाचा मृत्यू तर सहा जण जखमी ठाणे : सिमेंट मिक्स करणाऱ्या वाहनावरील ताबा सुटल्याने मिक्सर मुंब्रा बायपासचा कठडा तोडून प्रथमेश सोसायटीची सोसायटीच्या आवारात घुसला आणि पलटी झाला. या अपघातात एका 14 वर्षीय मुलाचा मृत्यू झाला असून सहा जण जखमी झाले आहेत. शनिवारी रात्री सव्वा आठच्या सुमारास मुंब्रा बायपासवरून सम्राट नगरकडे उतरणाऱ्या रस्त्यावर मिक्सर वाहनाच्या (क्र.एमएच 04 जेके 6417) वाहनचालकाचा ताबा सुटला. त्यामुळे मिक्सर बाजूच्या प्रथमेश सोसायटीची संरक्षण भिंत तोडून सोसायटीच्या आवारात पलटी झाला. या अपघातात नासिर शेख या 14 वर्षीय मुलाचा मृत्यू झाला. तर विशाल सोनावणे (25), अशिक इनामदार (15), प्रभाकर सलियान (48), अब्दुल वफा (50), फरीद शेख (54), आशा दाधवड (58) हे सहा जण जखमी झाले. जखमींवर नजीकच्या इस्पितळात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी मिक्सर वाहन चालकावर मुंब्रा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संबंधित बातम्या

Advertisement ADVERTISEMENT 300x475

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
Advertisement ADVERTISEMENT 300x475