जिल्हा

माथेफिरूने फोडल्या बसगाड्या; बस चालकावर कोयत्याने हल्ला

माथेफिरूने फोडल्या बसगाड्या; बस चालकावर कोयत्याने हल्ला
माथेफिरूने फोडल्या बसगाड्या; बस चालकावर कोयत्याने हल्ला फोटो: ठाणे वैभव
कल्याण : भर रस्त्यात एका माथेफिरूने मानसिक तणावाखाली बस अडवून बस चालकावर कोयत्याने हल्ला करण्याचा प्रयत्न केला. बस चालकाने प्रतिकार केल्याने या माथेफिरूने कोयत्याने बसची तोडफोड केली. इतकेच नव्हे आणखी दोन बसची तोडफोड केली आहे. कल्याण रामबाग परिसरात गुरुवारी रात्री ही घटना घडली. मोठ्या धाडसाने बस चालक आणि कंडक्टरने या माथेफिरूला पकडून महात्मा फुले पोलिसांच्या ताब्यात दिले. बाळू साबळे असे या माथेफिरूचे नाव असून काही वर्षांपूर्वी त्याची पत्नी त्याला सोडून गेली त्यानंतर तो मानसिक तणावात होता. याच मानसिक तणावातून त्याने हे कृत्य केल्याची माहिती पोलिसांनी दिली. गुरुवारी रात्री साडे आठ वाजण्याच्या सुमारास कल्याण पश्चिम राम बाग परिसरात एका माथेफिरूने हातात कोयता घेत चांगलाच धिंगाणा घातला. कडोंमपाची बस अडवून बस चालकावर कोयत्याने हल्ला करण्याचा प्रयत्न केला. चालकाने प्रतिकार केल्याने या माथेफिरूने बसवर कोयत्याने प्रहार करत बसेसच्या काचा फोडल्या. यानंतर पाठीमागून येणाऱ्या दोन बसेसच्या काचा फोडल्या. अचानक घडलेल्या या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली. बसचालक आणि कंडक्टरने मोठ्या धाडसाने या माथेफिरूला पकडले आणि पोलिसांच्या ताब्यात दिले. घटनेच्या माहितीनंतर महात्मा फुले पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत या माथेफिरूला ताब्यात घेतले. बाळू साबळे असे या माथेफिरूचे नाव असून काही वर्षांपूर्वी त्याची पत्नी त्याला सोडून गेली. त्यानंतर तो मानसिक तणावात होता. याच मानसिक तणावातून त्याने हे कृत्य केल्याची माहिती पोलिसांनी दिली.

संबंधित बातम्या

Advertisement ADVERTISEMENT 300x475

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
Advertisement ADVERTISEMENT 300x475