महाराष्ट्र
अंबरनाथमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
अंबरनाथमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
फोटो: ठाणे वैभव
अंबरनाथ : अंबरनाथच्या ऑर्डीनन्स फॅक्टरी परिसरातील अंबर चौकात सचिन भोसले (25) या तरुणाची चाकू भोसकून निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना मध्यरात्रीच्या सुमारास घडली आहे. या घटनेनंतर मारेकरी फरार झाले असून पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
पूर्व वैमनस्यातून ही हत्या झाल्याचा प्राथमिक अंदाज अंबरनाथ पोलिसांनी व्यक्त केला आहे. जावसई गाव येथील राहणारा सचिन भोसले याच्यावर . रात्रीच्या सुमाराला काही अज्ञात मारेकऱ्यांनी ऑर्डनन्स फॅक्टरीजवळील अंबर चौकात सचिनच्या गळ्यावर, मानेवर आणि पोटावर वार करून हत्या करण्यात आली.
ADVERTISEMENT 300x475
ADVERTISEMENT 300x475