महाराष्ट्र

रूंदे पुल पाण्याखाली; १२ गावांचा संपर्क तुटला

रूंदे पुल पाण्याखाली; १२ गावांचा संपर्क तुटला
रूंदे पुल पाण्याखाली; १२ गावांचा संपर्क तुटला फोटो: ठाणे वैभव
कल्याण : कल्याण तालुक्यातील ग्रामीण भागात असणारा काळू नदीवरील रूंदे पुल दोन दिवसांच्या दमदार पावसामुळे बुधवारी पाण्याखाली गेल्याने १० ते १२ गावांचा संपर्क तुटला आहे. यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. पावसाळ्यात अतिवृष्टीत काळुनदीच्या पाण्याखाली पुल जात असल्याने येथील रूंदे, आंबिवली, फळेगांव, नडगाव, उशीद, मढ, दानबाव, पळसोली, शेई, अंबरजे, काकडपाडा, कुंभारपाडा, गेरसे आदी १० ते १२ गावांचा शहराशी संपर्क तुटतो. पाण्याखाली गेलेल्या या पुलाची उंची कमी असल्याने व नवीन पुलाच्या कामाचा प्रश्न मार्गी लागत नसल्याने पावसाळ्यात अतिवृष्टीमुळे रूंदे पुल पाण्याखाली जात असल्याने वासिंद, खडवली, टिटवाळा भागाशी संपर्क तुटल्याने ग्रामस्थांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागले. यामुळे रूग्णांना, शालेय विद्यार्थी तसेच नोकरी-व्यवसाय करणा-या अनेक नागरिकांना यांचा फटका बसत असून यामुळे जनजीवन विस्कळीत झाले. कल्याण तालुक्यातील रुंदे काळू नदीवरील यंदाच्या पावसाळ्यात आतापर्यंत दुसऱ्यांदा पाण्याखााली पूल गेल्याने जनजीवन विस्कळीत होते. आता तरी प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देत नवीन उंच पुल बांधावा, अशी मागणी यानिमित्ताने जोर धरु लागली असल्याचे स्थानिक परमवीर पाटील यांनी सांगितले.

संबंधित बातम्या

Advertisement ADVERTISEMENT 300x475

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
Advertisement ADVERTISEMENT 300x475