जिल्हा

वीटभट्टी मजुरांची सुटली वेठबिगारीची मगरमिठी

वीटभट्टी मजुरांची सुटली वेठबिगारीची मगरमिठी
वीटभट्टी मजुरांची सुटली वेठबिगारीची मगरमिठी फोटो: ठाणे वैभव
भिवंडी: भिवंडी तालुक्यातील वीटभट्टी मालकांकडून तालुक्यासह ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील आदिवासी वीटभट्टी मजुरांची पिळवणूक करून त्यांना वेठबिगार म्हणून राबवून घेत असल्याच्या तक्रारी वाढल्या होत्या. श्रमजीवी संघटनेचे संस्थापक विवेक पंडित यांनी पोलिस आणि शासकीय अधिकाऱ्यांच्या मदतीने मैंदे गावातील वीटभट्टीवर छापा मारला. यावेळी त्यांनी 12 कुटुंबांतील 22 वेठबिगार कामगारांची सोडवणूक केली आहे. तालुक्यातील मैंदे गावातील शेंदे पाडा येथे खांडपे येथील शशिकांत पाटील यांचा वीटभट्टी व्यवसाय असून त्या ठिकाणी मागील कित्येक वर्षांपासून मजूर म्हणून 12 आदिवासी कुटुंब वीट बनविण्याचे काम करत होते. मालक शशिकांत पाटील यांनी कामगारांना त्यांच्या अंगावरील आगाऊ पैसे फिटत नाहीत तोपर्यंत दुसऱ्या कोणाकडे काम करण्यास मनाई करीत धमकावत मारहाण केली होती. या बाबतच्या तक्रारी समजल्यावर विवेक पंडित यांनी भिवंडी तहसीलदार कार्यालयातील नायब तहसीलदार अधिक पाटील, पडघा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रदीप गीते आणि संघटनेचे सरचिटणीस बाळाराम जाधव, प्रदेश उपाध्यक्ष विजय भोईर, जिल्हाध्यक्ष अशोक सपाटे, प्रवक्ता प्रमोद पवार तालुकाध्यक्ष सुनील लोणे, संगीता भोमटे यांसह वीटभट्टीवर सकाळी सहा वाजता छापा मारला. त्यावेळी आदिवासी मजुरांनी आपल्यावरील अन्यायाची कहाणी सांगितल्यावर सर्व 12 कुटुंबांतील भारती जाधव, साईनाथ जाधव दोन्ही राहणार भावरपाडा ता.विक्रमगड, संगीत पवार, संदिप पवार दोन्ही राहणार कानविंदे ता. शहापूर, अनिल जाधव, अनिता जाधव दोन्ही राहणार बिळघर ता. वाडा, सुनिल मुकणे सुनिता मुकणे दोन्ही राहणार जाळे ता. वाडा, गणपत पवार, अनिता पवार दोन्ही राहणार नालासोपारा ता. वसई, संगीता वाघ, चंद्रकांत वाघ दोन्ही राहणार माण ता.विक्रमगड, विवेक हिलोन, सविना हिलोम दोन्ही राहणार विक्रमगड, अरुण सवर, पुष्पा सवर दोन्हीं राहणार माण ता. विक्रमगड, आदर्श हिलम, अस्मीता हिलम दोघे राहणार बिलघर ता. वाडा, सारीका वाघ, मनसुराम वाघ दोघे राहणार जव्हार, मीरा मुकणे, दिनेश जाधव दोघे राहणार विक्रमगड जि. पालघर या 22 जणांना बंधमुक्त करीत यांच्या कुटुंबातील एकूण 43 जणांची सुटका केली आहे. 43 जणांना तेथून मुक्त करीत त्यांच्या बिऱ्हाडासह पडघा पोलिस ठाणे गाठले. तेथे राजेश मुकणे यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी वीटभट्टी मालक शशिकांत पाटील यांच्या विरोधात वेठबिगारीमुक्ती कायद्यास ॲट्रॉसिटी कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. वेठबिगारीतून मुक्त झालेल्या सुनीलने फोडले बिंग मागील महिन्यात २६ डिसेंबर रोजी तालुक्यातील चिंबिपाडा येथे सिद्दीकी शेख यांच्या वीटभट्टीवरील ११ वेठबिगार मजुरांची सुटका केली होती. त्यामध्ये चाविंद्रा येथील सुनील भोये यासह त्याच्या कुटुंबीयांचा समावेश होता. तेथून सुटका झाल्यावर सर्व उसगाव येथील श्रमजीवी संघटनेच्या मुख्यालयात वास्तव्यास होते. यातील सुनील याने पुढाकार घेत मैंदे येथील आदिवासी मजुरांची भेट घेऊन आपली अत्याचारातून कशी सुटका झाली याची माहिती दिल्याने येथील आदिवासी मजुरांनी पुढे येऊन तक्रार करण्याची हिम्मत दाखवली. देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्षे झाली तरी देशातील आदिवासी समाज आजही अनेक सुविधांपासून वंचित आहे. अनेकांकडे आधारकार्ड, रेशनकार्ड नाही, स्वतःचे घरकुल नाही. त्यांना केवळ वेठबिगार मुक्त करून भागणार नाही, गावात रोजगार उपलब्ध करून देण्याची गरज आहे, अशी प्रतिक्रिया श्रमजीवी संघटनेचे प्रवक्ते प्रमोद पवार यांनी दिली आहे.

संबंधित बातम्या

Advertisement ADVERTISEMENT 300x475

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
Advertisement ADVERTISEMENT 300x475