जिल्हा

जातनिहाय जनगणनेच्या निर्णयावर भाजपाचा ठाण्यात जल्लोष

जातनिहाय जनगणनेच्या निर्णयावर भाजपाचा ठाण्यात जल्लोष
जातनिहाय जनगणनेच्या निर्णयावर भाजपाचा ठाण्यात जल्लोष फोटो: ठाणे वैभव
ठाणे: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जातनिहाय जनगणना करण्याचा निर्णय घेतल्याबद्दल भाजपातर्फे ठाणे शहरात जल्लोष व्यक्त करण्यात आला. भाजपाचे ठाणे शहर जिल्हाध्यक्ष संजय वाघुले यांनी कार्यकर्त्यांसह रेल्वे स्टेशनबाहेर जल्लोष करून नागरिकांना लाडू वाटप करीत आनंद व्यक्त केला. भाजपा ठाणे शहर जिल्ह्याच्या वतीने रेल्वे स्टेशनबाहेरील सॅटीस पुलाखाली जल्लोष करुन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन व आभार मानण्यात आले. भाजपाच्या कार्यकर्त्यांनी घोषणा देत व नृत्य करीत आनंद व्यक्त केला. या वेळी माजी उपमहापौर सुभाष काळे, मुकेश मोकाशी, माजी ज्येष्ठ नगरसेवक भरत चव्हाण जिल्हा सरचिटणीस मनोहर सुगदरे, समीरा भारती, उपाध्यक्ष जयेंद्र कोळी, महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्ष स्नेहा पाटील, वृषाली वाघुले यांच्यासह पदाधिकारी मंडल अध्यक्ष, विविध प्रकोष्ट प्रमुख यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. स्वातंत्र्यापासून देशातील विविध समाजाकडून जातनिहाय जनगणनेची मागणी केली जात होती. परंतु, त्याला कॉंग्रेसने विरोध केला. कॉंग्रेसच्या ५४ वर्षांच्या सत्ताकाळात १९५१ ते २०११ पर्यंत झालेल्या जनगणनांवेळी अनुसूचित जाती जमातींची आकडेवारी दिली गेली. मात्र, ओबीसी समाजाची आकडेवारी कधीच दिली गेली नाही, याकडे भाजपाचे जिल्हाध्यक्ष संजय वाघुले यांनी लक्ष वेधले. तर भाजपाने आजवर जातनिहाय जन गणनेला कधीही विरोध केला नाही . केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी जातनिहाय जनगणनेला भाजपाचा पाठिंबा असल्याचे अनेकदा स्पष्ट केले होते. जनगणनेबरोबरच जातनिहाय गणना व्हावी, भाजपाची भूमिका आहे. आता जनगणनेबरोबरच जातनिहाय गणना होईल, याबद्दल वाघुले यांनी आनंद व्यक्त केला.

संबंधित बातम्या

Advertisement ADVERTISEMENT 300x475

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
Advertisement ADVERTISEMENT 300x475