जिल्हा

जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात भाजप युवा मोर्चाचे आंदोलन

जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात भाजप युवा मोर्चाचे आंदोलन
जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात भाजप युवा मोर्चाचे आंदोलन फोटो: ठाणे वैभव
ठाणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी नुकतेच सनातन धर्माबाबत वादग्रस्त वक्तव्य केले होते. याच्या निषेधार्थ भाजप युवा मोर्चाच्या वतीने सोमवारी आव्हाडांच्या घराबाहेर आंदोलन करण्यात आले. यावेळी युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी आव्हाड यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी यावेळी ताब्यात घेतले. माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी सनातन धर्माबाबत वादग्रस्त टिप्पणी केली होती. त्याचे पडसाद विधिमंडळाच्या अर्थसंकल्पिय अधिवेशनातही उमटले. भाजप आमदारांनी याबाबत सभागृहात जाबही विचारला. दरम्यान आव्हाड यांच्या या वक्तव्याचा भाजप ठाणे युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनीही निषेध केला. युवा मोर्चाचे ठाणे शहर अध्यक्ष सारंग मेढेकर यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी सकाळी आव्हाड यांच्या ठाण्यातील घरावर मोर्चा काढण्यात आला. या मोर्चाची कुणकुण आधीच ठाणे पोलिसांना लागली होती. परिणामी आव्हाड यांच्या घराकडे जाणाऱ्या मार्गांवर मोठया प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. तसेच त्यांच्या घराकडे जाणारा मार्ग पूर्णता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता. चौकशी शिवाय तिथे कोणालाही सोडण्यात येत नव्हते. दरम्यान सोमवारी दुपारी पावणे एकच्या सुमारास भाजप युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांचा मोर्चा आव्हाड यांच्या घराच्या दिशेने आला. या मोर्च्यात सहभागी कार्यकर्त्यांना पोलिसांनी आव्हाड यांच्या घरापासून काही अंतरावरच रोखले. यावेळी या कार्यकर्त्यांनी आव्हाड यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत निषेध व्यक्त केला. आंदोलन करणाऱ्या युवा मोर्चाच्या सुमारे १५ कार्यकर्त्यांना वर्तक नगर पोलिसांनी ताब्यात घेतले. चोकट भाजप युवा मोर्चाचे कार्यकर्ते एकीकडे आंदोलन करत असतांना. दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते शहरअध्यक्ष आनंद परांजपे यांच्या नेतृत्वाखाली एकत्र आले होते. या कार्यकर्त्यांनी यावेळी आमदर जितेंद्र आव्हाड यांच्या समर्थनार्थ घोषणा दिल्या.

संबंधित बातम्या

Advertisement ADVERTISEMENT 300x475

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
Advertisement ADVERTISEMENT 300x475