जिल्हा
पनवेल महापालिकेत भाजपचा डंका
पनवेल महापालिकेत भाजपचा डंका
फोटो: ठाणे वैभव
नवी मुंबईलगत असलेल्या पनवेल महापालिकेत भाजपने पुन्हा एकदा वर्चस्व सिद्ध केले. ७८ जागांसाठी झालेल्या निवडणुकीत भाजपने ५५ जागांवर विजय मिळवला. शिवसेना शिंदे गटाने दोन जागा मिळवल्या.
पनवेल महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीचा निकाल शुक्रवारी जाहीर झाला. या निवडणुकीत भाजप महायुतीने स्पष्ट बहुमत मिळवत महापालिकेवरील सत्ता कायम राखली, तर शेकाप, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरद पवार), शिवसेना (ठाकरे गट), समाजवादी पक्ष, महाराष्ट्र नवनिर्माण पक्ष अशा सहा विविध महाविकास आघाडीला अपेक्षेपेक्षा कमी जागांवर समाधान मानावे लागले.
या निकालानुसार भाजप ५५, शिंदे गट दोन, शेकाप-महाविकास आघाडीला १८ जागांवर यश मिळाले. त्यामुळे पनवेलच्या राजकारणात पुन्हा एकदा सत्ताधारी आणि विरोधक यांच्यातील फरक ठळकपणे समोर आला आहे.
विकासकामांचा मुद्दा, संघटित प्रचार यंत्रणा आणि उमेदवारीबाबत वेळेत घेतलेले निर्णय याचा लाभ महायुतीला झाल्याचे राजकीय जाणकारांचे मत आहे. अनेक प्रभागांत महायुतीच्या उमेदवारांनी प्रतिस्पर्थ्यांना स्पष्ट मताधिक्याने पराभूत करत वर्चस्व सिद्ध केले.
दुसरीकडे, शेकाप व महाविकास आघाडीला निवडणुकीपूर्व तयारीत झालेल्या चुका महागात पडल्याचे निकालातून दिसून आले. निवडणुका होणार याची पूर्वकल्पना असूनही आघाडीतील पक्षांकडून वेळेत नियोजन झाले नाही. आचारसंहिता लागू झाल्यानंतर उमेदवारांची शोधाशोध, जागावाटपावरून मतभेद आणि उशिरा ठरलेली नावे यामुळे अनेक प्रभागांत प्रचारासाठी पुरेसा वेळ मिळाला नाही. काही ठिकाणी ऐनवेळी उमेदवारी अर्ज मागे घेतल्याचा फटका थेट लढणाऱ्या उमेदवारांना बसला. प्रचाराच्या पातळीवरही दोन्ही बाजूंमध्ये मोठा फरक दिसून आला. सत्ताधारी महायुतीकडून मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री, कॅबिनेट मंत्री आणि राज्यमंत्र्यांच्या सभा झाल्या, तर महाविकास आघाडीतील मोजकेच नेते प्रचारात सक्रिय राहिले. काही प्रभागांत अंतर्गत मतभेद, अपक्ष उमेदवारांचे बंडखोरीचे प्रकार आणि स्थानिक समीकरणे आघाडीच्या अडचणी वाढवणारी ठरली.
300x450
300x600