जिल्हा

भाजपाने तलवार केली म्यान; महासभेत उठवणार नाही रान

भाजपाने तलवार केली म्यान; महासभेत उठवणार नाही रान
भाजपाने तलवार केली म्यान; महासभेत उठवणार नाही रान फोटो: ठाणे वैभव
ठाणे भाजपासाठी 'वरुन' निरोप आल्याची कुजबुज ठाणे: मागील सर्वसाधारण सभेत प्रश्नोत्तरे आणि लक्ष्यवेधी न घेणाऱ्या सत्ताधारी शिवसेनेच्या विरोधात रान उठविणाऱ्या भाजपाने बुधवारी होणाऱ्या महासभेत मात्र तलवार म्यान केल्याची माहिती हाती आली आहे. ठाणे महापालिकेची सर्वसाधारण सभा १८ मार्च रोजी होणार असून या सर्वसाधारण सभेत यावेळी देखिल नगरसेवकांचे प्रश्न आणि लक्ष्यवेधी सूचना घेण्यात येणार नाहीत, अशी माहिती हाती आली आहे. शिवसेना आणि महापालिकेच्या सर्वपक्षीय गटनेत्यांच्या बैठकीत त्यावर चर्चा झाली असून प्रश्नोत्तरे आणि लक्ष्यवेधी या महासभेत न घेता पुढील महिन्यात होणाऱ्या सर्वसाधारण सभेत त्यावर चर्चा करण्याबाबत एकमत झाले आहे. त्यामुळे सुमारे १५ दिवस अगोदर प्रश्न देऊन प्रशासनाला अडचणीत आणण्याचे मनसुबे असलेल्या नगरसेवकांचा हिरमोड झाला आहे. या सर्वसाधारण सभेत शहराच्या नागरी सुविधांबाबत तसेच भ्रष्टाचाराबाबतचे प्रश्न विचारण्यात आले होते. महापालिकेची आर्थिक परिस्थिती अतिशय हलाखीची आहे, ते खरे आहे का, याची माहिती घेणे हा लोकप्रतिनिधींचा अधिकार आहे. त्यामुळे प्रश्नोत्तरे घेणे हा लोकप्रतिनिधींचा अधिकार असून त्यावर चर्चा घेणे अपेक्षित असल्याच्या भावना विरोधी आणि सत्ताधारी पक्षातील नगरसेवकांनी 'ठाणेवैभव'कडे व्यक्त केल्या. पुढील सर्वसाधारण सभेत तरी त्याबद्दल चर्चा करावी अशी अपेक्षा या नगरसेवकांनी व्यक्त केली आहे. मागिल सर्वसाधारण सभेत भाजपाच्या नगरसेवकांचे प्रश्न घेण्यात आले नाहीत तसेच त्यांची लक्ष्यवेधी घेण्यात आली नव्हती. उलट सत्ताधारी शिवसेनेने कोणत्याही प्रकारची चर्चा न करता विषय पत्रिका मंजूर केली होती. त्याच्या निषेधार्थ भाजपाने सत्ताधारी शिवसेनेच्या विरोधात घोषणाबाजी करून मंजूर झालेली विषयपत्रिका नामंजूर करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रार देखिल करण्यात आली होती, परंतु या सर्वसाधारण सभेत पुन्हा एकदा प्रश्नोत्तरे आणि लक्ष्यवेधी घेण्यात येणार नाही, परंतु त्याला भाजपाने मूक संमती दिल्यामुळे वरून काही निरोप तर आला नाही ना अशी चर्चा दबक्या आवाजात सुरु झाली आहे.

संबंधित बातम्या

Advertisement ADVERTISEMENT 300x475

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
Advertisement ADVERTISEMENT 300x475