जिल्हा

कोपरखैरणेत पैसे वाटणाऱ्याला भाजप पदाधिकाऱ्यांनी दिला चोप

कोपरखैरणेत पैसे वाटणाऱ्याला भाजप पदाधिकाऱ्यांनी दिला चोप
कोपरखैरणेत पैसे वाटणाऱ्याला भाजप पदाधिकाऱ्यांनी दिला चोप फोटो: ठाणे वैभव
नवी मुंबई: नवी मुंबई महानगरपालिका निवडणुकीत प्रचाराचा अवघा एक दिवस शिल्लक राहिला आहे. त्यामुळे दारोदार प्रचाराचा कार्यक्रम संपत आला असताना काही उमेदवारांनी पैसे वाटपाचा कार्यक्रम हाती घेतला आहे. यावरूनच कोपरखैरणेत पैसे वाटणाऱ्या एका व्यक्तीला भाजप पदाधिकाऱ्यांनी पकडून चांगलाच चोप दिला आहे. नवी मुंबई महानगरपालिका निवडणूक प्रचार अंतिम टप्प्यात आला असून निवडणुकीचे वातावरण चांगलेच तापले आहे. नवी मुंबई शहरात खरी लढत ही शिवसेना (शिंदे) आणि भाजपमध्ये आहे. अशातच मतदानाला अवघे दोन दिवस शिल्लक असतानाच काही उमेदवारांनी पैसे वाटपाला सुरुवात केली आहे. नवी मुंबईत एका मताला किमान दोन हजार ते कमाल तीन हजार रुपये दिले जात आहेत, अशी चर्चा आहे. अशातच सोमवार १३ जानेवारी रोजी कोपरखैरणे प्रभाग क्रमांक ११मध्ये भाजप पदाधिकाऱ्यांनी एका व्यक्तीला मतदारांना पैसे वाटताना पकडले. ही व्यक्ती शिवसेनेचा कार्यकर्ता असल्याचा आरोप भाजप पदाधिकाऱ्यांनी केला आहे. त्यामुळे पैसे वाटप करताना पकडल्यानंतर सदर व्यक्ती आणि भाजप पदाधिकारी यांच्यात बाचाबाची होऊन झटापटी झाली. या व्यक्तीला भाजप पदाधिकाऱ्यांनी रंगेहाथ पकडून चांगलाच चोप दिला आहे.

संबंधित बातम्या

Advertisement ADVERTISEMENT 300x475

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
Advertisement ADVERTISEMENT 300x475