जिल्हा

वाशीतील भावे नाट्यगृह सर्वोत्तम नाट्यगृह-मुक्ता बर्वे

वाशीतील भावे नाट्यगृह सर्वोत्तम नाट्यगृह-मुक्ता बर्वे
वाशीतील भावे नाट्यगृह सर्वोत्तम नाट्यगृह-मुक्ता बर्वे फोटो: ठाणे वैभव
नवी मुंबई: एकीकडे नाट्यगृहात मिळणाऱ्या अपुऱ्या सेवांबद्दल नाट्य कलाकार नाराजी व्यक्त करत असतात, मात्र दुसरीकडे नवी मुंबईतील भावे नाट्यगृहात मिळणाऱ्या सेवा सुविधांबाबत नाट्य कलाकारांनी समाधान व्यक्त करत सोशल मीडियावर स्तुती केली आहे. सुप्रसिद्ध अभिनेत्री मुक्ता बर्वे यांनी नवी मुंबई महानगरपालिकेच्या वाशीतील विष्णुदास भावे नाट्यगृहात रविवारी 'चारचौघी' या नाटकाचा प्रयोग करण्यापूर्वी नाट्यगृहातील स्वच्छता, रंगभूषा कक्ष, वातानुकूलित यंत्रणा ते अगदी डासविरहित पिटापर्यंत विविध सुविधांचा आढावा घेत 'अप्रतिम नाट्यगृह' अशा शब्दात कौतुक केले. मुक्ता बर्वे यांच्यासह ज्येष्ठ अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी, पर्ण पेठे, कादंबरी कदम, श्रेयस राजे तसेच सहकारी तंत्रज्ञ यांनी या नाट्यगृहाची इतर नाट्यगृहांनी प्रेरणा घ्यावी, असे मत व्यक्त केले.

संबंधित बातम्या

Advertisement ADVERTISEMENT 300x475

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
Advertisement ADVERTISEMENT 300x475