जिल्हा

ऑनलाईन फसवणूक करुन मोबाईल विक्री करणाऱ्या भामट्यांना अटक

ऑनलाईन फसवणूक करुन मोबाईल विक्री करणाऱ्या भामट्यांना अटक
ऑनलाईन फसवणूक करुन मोबाईल विक्री करणाऱ्या भामट्यांना अटक फोटो: ठाणे वैभव
भाईंदर: बँक खात्यातील पैसे ऑनलाइन काढून महागडे मोबाईल ऑनलाईन खरेदी करुन त्यांची विक्री करणाऱ्या दोन भामट्यांना भाईंदर पोलिसांनी अटक केली आहे. त्यांचे आणखी साथीदार असल्याचे चौकशीत उघड झाले असून पोलीस दोन फरार साथीदारांचा शोध घेत आहेत. आरोपी हे नागरिकांचा वाहन क्रमांक व मोबाईल क्रमांक प्राप्त करून ॲप लिंकव्दारे मोबाईल हॅक करायचे. त्यानंतर कॉल फॉरवर्डिंग, एसएमएस फॉरवर्डिंग, व्ह्यू एसएमएस, सेंड एसएमएस, यूपीआय पिन ग्रॅबर, व्ह्यू लॉग्ड इन जीमेल, कॉन्टॅक्ट लिस्ट ऍक्सेस, कॉल लॉग ऍक्सेस, सिक्युर लॉगिन + चेंज पासवर्ड कॉल, अशा फिचर्सचा ॲक्सेस घेऊन नागरिकांच्या बँक खात्यांची माहिती आणि ओटीपी मिळवायचे. त्यानंतर नागरिकांच्या खात्यांमधून ऑनलाईन पैसे ई कॉमर्स कंपनीला वळते करून महागडे मोबाईल फोन खरेदी करत होते. ते मोबाईल फोन अन्य नागरिकांना विक्री करून त्यांची देखील फसवणूक करण्यात येत होती. ऑनलाईन मोबाईल फोन खरेदी केला नसताना देखील आमच्या बँक खात्यातून पैसे कापण्यात आले आहेत, अशा प्रकारची तक्रार भाईंदर पोलीस ठाण्यात करण्यात आली होती. संबंधित तक्रारदार यांनी बुक न केलेल्या चार फोनची डिलिव्हरी भाईंदर येथे एका व्यक्तीने रस्त्यावर घेतल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर परिमंडळ-१ चे उपायुक्त राहुल चव्हाण यांनी या प्रकरणाचा सखोल तपास केला. या फसवणुकीत CRED. Apk, MParivahan Fake UI. Apk, Adult Chat. Apk या बोगस लिंक नागरिकांना पाठवून मोबाईल हॅक करून ओ.टी.पी. मिळवून मोबाईल खरेदी केला जायचा. त्यानंतर तो अन्य लोकांना विक्री केला जायचा अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. या प्रकरणी भाईंदर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात अधिक दोन आरोपी निष्पन्न झाले असून त्यांचा शोध पोलीस घेत आहेत. लवकरच त्यांना अटक करण्यात येईल, अशी माहिती पोलीस उपायुक्त राहुल चव्हाण यांनी दिली. अटक करण्यात आलेल्या दोन आरोपींकडून २८ महागडे मोबाईल फोन, चार लाख रुपये रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे.

संबंधित बातम्या

Advertisement ADVERTISEMENT 300x475

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
Advertisement ADVERTISEMENT 300x475