जिल्हा

अडीच कोटींच्या महागड्या गाड्यांसह भामटा जेरबंद

अडीच कोटींच्या महागड्या गाड्यांसह भामटा जेरबंद
अडीच कोटींच्या महागड्या गाड्यांसह भामटा जेरबंद फोटो: ठाणे वैभव
ठाणे: ज्यादा भाड्याने चारचाकी गाड्या लावण्याचे आमिष दाखवून अनेक गाडी मालकांना टोपी घालणाऱ्या एका भामट्याला वागळे गुन्हे शाखेच्या पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. त्याच्याकडून अडीच कोटी रुपये किमतीच्या ३२ महागड्या गाड्या जप्त करण्यात आल्या आहेत. संदीप शेट्टी रा. नवी मुंबई असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. वागळे भागात राहणाऱ्या एका तक्रारदाराला महिन्याला अधिकचे भाडे देण्याचे आमिष दाखवले होते. त्याच्या अमिषाला बळी पडून तक्रारदाराने या भामट्याकडे पाच गाड्या भाड्याने लावल्या होत्या, परंतु या भामट्याने गाडी मालकाला कोणत्याही प्रकारचे भाडे न देता त्यांच्या गाड्या परस्पर गहाण ठेऊन पैसे घेतले होते. त्या बाबतची तक्रार वागळे पोलिस ठाण्यात नोंदविण्यात आल्यावर पोलिसांनी आरोपीच्या मोबाईलचे लोकशन आणि गुप्त बातमीदाराच्या मदतीने ६ फेब्रुवारी रोजी भामट्याला नवी मुंबईमधील उलवे येथून अटक केली असता त्याने अशा प्रकारे अनेकांना गंडा घातल्याची माहिती दिली. त्याने दिलेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी छत्रपती संभाजी नगर परभणी, नवी मुंबई, पुणे, आळेफाटा, लोणावळा, जालना, पनवेल, कल्याण आदी भागातून थार, इंनोवा, स्वीफ्ट, इराटिका अशा प्रकारच्या दोन कोटी ४४ लाख ५५ हजार रुपये किमतीच्या ३२ गाड्या पोलिसांनी जप्त केल्याची माहिती गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त अमरसिंग जाधव यांनी दिली. या भामट्याने आणखी काही गाडी मालकांची फसवणूक केली असावी, असा पोलिसांना संशय असून आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.

संबंधित बातम्या

Advertisement ADVERTISEMENT 300x475

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
Advertisement ADVERTISEMENT 300x475