महाराष्ट्र

महावितरणच्या पथकाला मारहाण

महावितरणच्या पथकाला मारहाण
महावितरणच्या पथकाला मारहाण फोटो: ठाणे वैभव
ठाणे : थकबाकीमुळे वीजपुरवठा खंडित करताना महावितरणच्या पथकाला मारहाण करण्याची घटना भिवंडी तालुक्यातील पाच्छापूर येथे गुरुवारी (२१ मार्च) घडली. या प्रकरणी पडघा पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध सरकारी कामात अडथळा व मारहाणीचा गुन्हा दाखल झाला आहे. अनिकेत जाधव (रा. पाच्छापूर, ता. भिवंडी) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. बाळाराम जाधव या ग्राहकाचे वीजबिल थकीत असल्यामुळे अंबाडी शाखेचे वरिष्ठ तंत्रज्ञ कुशल काकडे यांच्या पथकाने जाधव यांचा वीजपुरवठा खंडित करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी जाधव यांचा मुलगा अनिकेत याने काकडे आणि त्यांच्या समवेतच्या सुरक्षा रक्षकालाही दमदाटी व मारहाण केली. काकडे यांच्या फिर्यादीवरून पडघा पोलिसांनी सरकारी कामात अडथळ्यासह भारतीय दंड विधानच्या चार कलमान्वये आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. महावितरणच्या कर्मचा-यांना मारहाण व दमदाटीच्या गुन्ह्यात जबर शिक्षेची तरतूद आहे. सध्या मार्च अखेरमुळे कर्मचारी थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करण्याची कारवाई करत आहेत. या कर्मचा-यांच्या कामात अडथळा न आणता त्यांना सहकार्य करण्याचे आवाहन ‘महावितरण’ने केले आहे.

संबंधित बातम्या

Advertisement ADVERTISEMENT 300x475

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
Advertisement ADVERTISEMENT 300x475