जिल्हा

मुंबईत एकनाथ शिंदेंची बार्गेनिंग पॉवर वाढली

मुंबईत एकनाथ शिंदेंची बार्गेनिंग पॉवर वाढली
मुंबईत एकनाथ शिंदेंची बार्गेनिंग पॉवर वाढली फोटो: ठाणे वैभव
महायुतीला मुंबई महापालिकेत काठावरचे बहुमत मुंबई: मुंबईत महायुतीला काठावरचे बहुमत मिळाल्याने शिंदे गटाची बार्गेनिंग पॉवर वाढल्यानं एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडून भाजपकडे महापौर पदाची मागणी करण्यात आल्याच्या चर्चा आहेत. स्थायी समितीसह इतर समित्यांसाठी देखील शिवसेना आग्रही राहू शकते. मुंबई महापालिकेत सत्ता स्थापनेसाठी भाजपला शिवसेनेची गरज आहे. भाजपकडे सध्या 89 नगरसेवक आहेत तर शिंदेंच्या शिवसेनेकडे 29 जागा आहेत. मुंबई महापालिकेत 227 जागा असल्याने बहुमतासाठी 114 संख्याबळ आवश्यक आहे. यामुळे भाजपला एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची गरज असल्याचे दिसून येत आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दीचे वर्ष असल्याने या कालावधीत मुंबईचे महापौरपद शिवसेनेकडे असावे अशाही चर्चा आहेत. मुंबई महापालिका निवडणुकीत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने 92 जागा लढल्या होत्या. यामध्ये एकनाथ शिंदे यांचे 29 नगरसेवक विजयी झाले आहेत. भाजपचे 89 नगरसेवक मुंबई महापालिका निवडणुकीत विजयी झाले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसने दोन आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा एक नगरसेवक विजयी झाला आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे 65 नगरसेवक विजयी झाले आहेत. मनसेचे सहा उमेदवार विजयी झाले आहेत. काँग्रेसला 24 जागा मिळाल्या तर एमआयएमला आठ आणि समाजवादी पक्षाला दोन जागा मिळाल्या आहेत. संजय राऊत काय म्हणाले? मुंबईचा महापौर शिवसेनेचा किंवा ठाकरे बंधूंचा व्हावा यापेक्षा भाजपचा होऊ नये ही सगळ्यांची भावना आहे. देवाची इच्छा असेल तर शिवसेनेचा महापौर बसू शकतो, असं संजय राऊत म्हणाले. काल उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यात चर्चा झाली, असं संजय राऊत म्हणाले. अनेकांशी चर्चा सुरु आहे, आम्ही तटस्थपणे हालचालींकडे पाहत आहोत, पडद्यामागं बऱ्याच घडामोडी घडताहेत. तुमचं बहुमत किती मोठं असो किंवा छोटं असुद्यात बहुमत हे चंचल असतं. तुम्ही नगरसेवकांना किती काळ कोंडून ठेवणार आहात. तुमचे नगरसेवक मूळचे शिवसेनेचे आहेत. भाजपचा महापौर व्हायचा नाही हे सर्वांनी ठरवले आहे. तुम्ही नगरसेवकांना कोंडून ठेवलं असलं तरी संदेश येत असतात, असं संजय राऊत म्हणाले.

संबंधित बातम्या

Advertisement ADVERTISEMENT 300x475

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
Advertisement ADVERTISEMENT 300x475