जिल्हा

पुलावरून बॅनर कोसळला; सुदैवाने दुचाकीस्वार बचावले

पुलावरून बॅनर कोसळला; सुदैवाने दुचाकीस्वार बचावले
पुलावरून बॅनर कोसळला; सुदैवाने दुचाकीस्वार बचावले फोटो: ठाणे वैभव
ठाणे : ठाण्यातील तीनहात नाका येथील पूर्व द्रुतगती महामार्गावरील पादचारी पुलावर वाढदिवसानिमित्त लावण्यात आलेला भला मोठा बॅनर रविवारी सकाळी अचानक धावत्या दुचाकीवर कोसळला. सुदैवाने दुचाकीस्वार आणि सहप्रवासी तरुणी बचावले. या घटनेनंतर अनधिकृत बॅनरबाजीचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, अशा बॅनरना परवानगी कोण देतो, सुरक्षिततेचे निकष पाळले जातात का आणि संबंधितांवर कारवाई का होत नाही, असे अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. उपमहापौर कृष्णा पाटील यांनीही या प्रकारावर तीव्र नाराजी व्यक्त केली. अतिक्रमण विभाग, जाहिरात विभाग आणि प्रभाग समिती यांनी तातडीने नोटिसा बजावून कठोर कारवाई करावी. तसेच यासाठी महापालिकेने स्पष्ट आणि कठोर धोरण स्वीकारणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. या घटनेची गंभीर दखल घेत ठाणे महापालिकेने शहरातील अनधिकृत बॅनर आणि होर्डिंग्ज हटविण्याची मोहीम तीव्र केली आहे. सार्वजनिक सुरक्षेला धोका निर्माण करणाऱ्या बॅनरधारकांवर कठोर कारवाईचा इशाराही प्रशासनाने दिला आहे.

संबंधित बातम्या

Advertisement ADVERTISEMENT 300x475

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
Advertisement ADVERTISEMENT 300x475