महाराष्ट्र

बदलापूर उपजिल्हा रुग्णालयाला जिल्हा सामान्य रुग्णालयाचा दर्जा

बदलापूर उपजिल्हा रुग्णालयाला जिल्हा सामान्य रुग्णालयाचा दर्जा
बदलापूर उपजिल्हा रुग्णालयाला जिल्हा सामान्य रुग्णालयाचा दर्जा फोटो: ठाणे वैभव
५० खाटांचे रुग्णालय होणार २०० खाटांचे ठाणे : बदलापूरमधील उपजिल्हा रुग्णालयाचा चेहरामोहरा बदलला जाणार आहे. ५० खाटांच्या रुग्णालयाला जिल्हा सामान्य रुग्णालयाचा दर्जा राज्य सरकारने दिला असून, लवकरच या रुग्णालयाचे रूपांतर २०० खाटामध्ये होणार आहे. अद्यावत उपकरणांनी सुसज्ज असणाऱ्या रुग्णालयात अतिदक्षता विभाग, डिलिव्हरी-सिझर विभाग, अतिदक्षता विभाग, डायलिसिस आदी सोयी सुविधा मिळणार आहेत. जिल्ह्याच्या ग्रामीण अणि दुर्गम भागातील रुग्णांना सरकारी रुग्णालयात खाटांची संख्या कमी असल्यामुळे काहीवेळा धावाधाव करावी लागते. मात्र आता जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयातील खाटांची संख्या वाढणार आहे. बदलापूर येथील उपजिल्हा रुग्णायात एकूण ५० खाटांची सोय आहे. मात्र बदलापूर मधील लोकसंख्येच्या तुलनेत अपुरी पडत आहे. या रुग्णालयात अत्याधुनिक सोयीसुविधा वाढवून खाटाची संख्या वाढवण्याची मागणी गेल्या अनेक वर्षांची पासूनची आहे. त्यामुळे राज्य सरकारने या बाबत सकारात्मक दृष्टिकोनातून विचार करत या रुग्णालयाला जिल्हा सामान्य रुग्णालयाचा दर्जा देण्याचा निर्णय घेतला आहे. ५० खाटांची सोय असणाऱ्या या रुग्णालयात आणखी १५० खाटा वाढणार आहेत. ठाण्यातील सिव्हील रुग्णालया प्रमाणेच येथेही चांगल्या सोयी सुविधा मिळणार आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून नवीन अद्यावत इमारत बांधण्यात येणार असून, डिलिव्हरी-सिझर विभाग, अतिदक्षता विभाग, डायलिसिस, बाह्य विभाग, सर्जरी, आदींसाठी अत्याधुनिक यंत्रणांनी सुसज्ज असे रुग्णालय होणार आहे. जिल्ह्यातील सिव्हील रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय ग्रामीण रुग्णालय आदी राज्य शासनाच्या अखत्यारीत असणाऱ्या रुग्णालयात सद्यस्थितीत एकूण ९७६ खाटा आहेत. मात्र येत्या काही महिन्यात ही संख्या तिपटीने वाढणार आहे. त्यामुळे ठाणे जिल्ह्यातील रुग्णांना उपचारासाठी जास्त धावाधाव करावी लागणार नाही. शासनाने उपजिल्हा रुग्णालयाचे जिल्हा सामान्य रुग्णालयात श्रेणीवर्धन करण्यास मान्यता दिली आहे, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. कैलास पवार यांनी दिली.

संबंधित बातम्या

Advertisement ADVERTISEMENT 300x475

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
Advertisement ADVERTISEMENT 300x475