जिल्हा

बदलापूर राष्ट्रवादीच्या नगरसेविकांनी घेतली अजित पवार यांची भेट

बदलापूर राष्ट्रवादीच्या नगरसेविकांनी घेतली अजित पवार यांची भेट
बदलापूर राष्ट्रवादीच्या नगरसेविकांनी घेतली अजित पवार यांची भेट फोटो: ठाणे वैभव
बदलापूर: बदलापूर नगरपालिका निवडणुकीमध्ये विजयी झालेल्या नगरसेविकांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष तथा उप मुख्यमंत्री अजित पवार यांची नुकतीच सदिच्छा भेट घेतली. बदलापूर पालिकेच्या निवडणुका नुकत्याच पार पडल्या. या निवडणुकीत सुगंधा पाटील, प्रियांका दामले आणि हर्षला गायकवाड या तीन नगरसेविकांनी परशुराम आर्थिक विकास मंडळाचे अध्यक्ष आशिष दामले यांच्या नेतृत्वाखाली उप मुख्यमंत्री पवार यांची भेट घेतली. आगामी काळामध्ये पक्षाच्या माध्यमातून नागरिकांच्या समस्या सोडवताना विकासाभिमुख आणि लोकहिताची कामे करण्याचा निर्धार करण्याचा सल्ला उप मुख्यमंत्री पवार यांनी देऊन नवनिर्वाचित नगरसेवकांचे अभिनंदन केल्याची माहिती कॅप्टन दामले यांनी दिली. पक्षाने दिलेली संधी आणि नागरिकांनी दाखवलेला विश्वास सार्थ करण्यात येईल अशी ग्वाही पाटील, दामले आणि गायकवाड या तिन्ही नगरसेविकांनी दिली. पक्षाचे शहराध्यक्ष प्रभाकर पाटील, राम लिये आणि ॲड. तुषार साटपे आदी पदाधिकारी याप्रसंगी उपस्थित होते.

संबंधित बातम्या

Advertisement ADVERTISEMENT 300x475

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
Advertisement ADVERTISEMENT 300x475