जिल्हा
आशिष दामले आता राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस
आशिष दामले आता राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस
फोटो: ठाणे वैभव
बदलापूर: बदलापूर राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष कॅप्टन आशिष दामले यांना बढती मिळाली असून त्यांची प्रदेश सरचिटणीसपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
पक्षाध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निवासस्थानी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी कॅप्टन दामले यांना प्रदेश सरचिटणीस पदाचे नियुक्ती पत्र प्रदान केले. बदलापूर राष्ट्रवादी शहराध्यक्षपदी नियुक्ती झाल्यानंतर श्री. दामले यांनी पक्ष संघटना मजबूत होण्यासाठी सर्वांना विश्वासात घेऊन विविध उपक्रम राबवले. कोरोना काळातही विविध प्रकारे गरजूंना सोयी उपलब्ध करून दिल्या होत्या. श्री. दामले यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांची प्रदेश सरचिटणीस पदी नियुक्ती केली आहे.
दामले यांची प्रदेश सरचिटणीसपदी नियुक्ती झाल्यानंतर बदलापूर राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्षपदी माजी नगरसेवक प्रभाकर पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. श्री. दामले यांच्या शिफारशीनुसार श्री.पाटील यांची शहराध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
ADVERTISEMENT 300x475
ADVERTISEMENT 300x475