महाराष्ट्र

नेहमीप्रमाणे उद्धव ठाकरेंचे रडगाणे सुरु झाले आहे

नेहमीप्रमाणे उद्धव ठाकरेंचे रडगाणे सुरु झाले आहे
नेहमीप्रमाणे उद्धव ठाकरेंचे रडगाणे सुरु झाले आहे फोटो: ठाणे वैभव
देवेंद्र फडणवीस यांचे प्रत्युत्तर मुंबई: मुंबईत ज्या ठिकाणी शिवसेनेची मतं आहेत, त्या ठिकाणी जाणीवपूर्वक संथ गतीने मतदान सुरु असून निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत आहे, असा आरोप उद्धव ठाकरे यांनी केला होता. या आरोपाला आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिले आहे. पराभव दिसू लागल्याने उद्धव ठाकरेंनी नेहमीप्रमाणे रडगाणं सुरू केलं आहे, असं ते म्हणाले. एक्स या समाज माध्यमावर पोस्ट करत त्यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया दिली. मुंबईत संथ गतीने मतदान होत असल्याची तक्रार सर्वप्रथम आम्हीच आयोगाकडे केली होती. आता मात्र, नेहमीप्रमाणे उद्धव ठाकरे यांनी त्यांचे रडगाणे सुरु केले आहे. पराभव समोर स्पष्ट दिसत असताना त्यांनी सवयीप्रमाणे मोदीजींवर आरोप करणे सुरू केले आहे. ४ जूननंतरच्या स्थितीला सामोरे जाण्याची पार्श्वभूमी ते आताच तयार करत आहेत. शिवाय निवडणूक प्रक्रियेतील अधिकाऱ्यांना धमक्याही दिल्या जात आहेत, अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी दिली. माझी तमाम मुंबईकरांना विनंती आहे की, मतदान केंद्रावर जा आणि मोठ्या संख्येने मतदान करा. ६ वाजले तरी जितके लोक आतमध्ये असतील, त्या प्रत्येकाला मतदान करता येते. त्यामुळे मतदानाचा आपला हक्क बजावल्याशिवाय राहू नका, असे आवाहनही फडणवीस यांनी केले.

संबंधित बातम्या

Advertisement ADVERTISEMENT 300x475

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
Advertisement ADVERTISEMENT 300x475