जिल्हा
ब्रह्मांड कट्ट्याचा अर्णव बोपालकर 'मी होणार सुपरस्टार'मध्ये चमकला
ब्रह्मांड कट्ट्याचा अर्णव बोपालकर 'मी होणार सुपरस्टार'मध्ये चमकला
फोटो: ठाणे वैभव
ठाणे: ब्रह्मांड स्थित ब्रह्मांड संगीत कट्टयाचा ११ वर्षांचा अर्णव बोपालकर याची "मी होणार सुपरस्टार छोटे उस्ताद" या स्टार प्रवाह वाहिनीवरील छोट्यांच्या मोठ्या गायन स्पर्धेत पाच हजार स्पर्धकांमधून निवड झाली आहे.
3 जानेवारी 2026 रोजी त्याचा पहिला एपिसोड टी.व्हि. वर प्रदर्शित झाला. त्याने पहिल्याच परफॉर्मन्समध्ये सर्व महागुरूंची मने तर जिंकलीच पण अभिनेता सचिन पिळगावकर यांनी त्याला त्यांच्या सिनेमात काम करण्यासाठी आणि गाणे गाण्यासाठी ऑफर दिली. तर वैशाली सामंत आणि आदर्श शिंदे यांनीही अर्णवचे कौतुक केले. शनिवार-रविवारी, स्टार प्रवाह वाहिनीवर हा कार्यक्रम पहायला विसरू नका, असे आवाहन ब्रह्मांड कट्टयाचे संस्थापक राजेश जाधव यांनी केले आहे.
ADVERTISEMENT 300x475
ADVERTISEMENT 300x475