जिल्हा
भारतीय सैन्याकडून ठाण्यातील`नाना साठे प्रतिष्ठानला आर्मी टीशर्ट
भारतीय सैन्याकडून ठाण्यातील`नाना साठे प्रतिष्ठानला आर्मी टीशर्ट
फोटो: ठाणे वैभव
ठाणे: ठाण्यातील नाना साठे प्रतिष्ठानच्या दिवाळी उपक्रमाच्या माध्यमातून सैनिकांशी निर्माण झालेल्या भावनिक नात्याची पावती म्हणून भारतीय सैन्याकडून नाना साठे प्रतिष्ठानला ‘आर्मी टी-शर्ट’ची भेट देण्यात आली आहे. ही घटना ठाणेकरांसाठी अभिमानास्पद ठरली आहे.
गेल्या तीन वर्षांपासून ठाण्यातील नाना साठे प्रतिष्ठान (एनएसपी) मार्फत भारतीय सैन्यातील सैनिकांना दिवाळीनिमित्त भेट पाठवण्यात येत आहे. या कार्याला भरपूर मिळणाऱ्या प्रतिसादामुळे ह्या वर्षी देखील सहा आर्मी बेस कॅम्पपर्यंत जवळजवळ २००० फराळाचे बॉक्सेस नाना साठे प्रतिष्ठानमार्फत पाठवण्यात आले. तसेच लहान मुलांनी केलेल्या कविता, बनवलेले शुभेच्छा कार्ड फराळाच्या पेट्यांबरोबर पाठवण्यात आले होते. नाना साठे प्रतिष्ठानाला देणगी देणाऱ्या देणगीदारांचे तसेच तेजश्री मोकाशी (गोकुळ मेझच्या संस्थापक) यांचे सलग तिसऱ्या वर्षी दिवाळी प्रकल्प यशस्वी केल्याबद्दल प्रतिष्ठानकडून आभार मानण्यात आले. प्रतिष्ठानच्या सदस्यांसह २५ लहान मुलांनी या प्रकल्पात भाग घेतला होता. या सर्वांना कौतुकाचे प्रतीक म्हणून भारतीय सैन्याकडून आर्मी टी-शर्ट देण्यात आले आहेत.
ADVERTISEMENT 300x475
ADVERTISEMENT 300x475