महाराष्ट्र
एपीएमसी बाजारात अमेरिकन सफरचंद दाखल
एपीएमसी बाजारात अमेरिकन सफरचंद दाखल
फोटो: ठाणे वैभव
नवी मुंबई : वाशीतील कृषी उत्पन्न फळ बाजारात परदेशी अमेरिकन सफरचंद दाखल झाले आहेत.
हे सफरचंद रंगाने गडद गुलाबी असून चवीला मध्यम गोड आणि खारट आहेत. त्यामुळे या सफरचंदाची बाजारात मोठ्या प्रमाणात खरेदी केली जात आहे. सध्या सफरचंदाचा हंगाम सुरु झाला असून देशी सफरचंदासोबत आफ्रिका, तुर्कस्तान आणि न्युझीलंडमधील सफरचंद देखील आगामी दिवसांत दाखल होणार आहेत.
बाजारात देशी ८० ते ११० रुपये तर परदेशी सफरचंद २०० ते २२० रुपये प्रती किलोने विकले जात आहेत. वाढती मागणी पाहता आगामी काळात दर आणखी वाढण्याची शक्यता फळ व्यापारी अनु सहानी यांनी दिली.
ADVERTISEMENT 300x475
ADVERTISEMENT 300x475