जिल्हा

महाराष्ट्रात धर्मांतर विरोधी कायदा लागू होणार

महाराष्ट्रात धर्मांतर विरोधी कायदा लागू होणार
महाराष्ट्रात धर्मांतर विरोधी कायदा लागू होणार फोटो: ठाणे वैभव
* मंत्रिमंडळाची विधेयकाला मंजुरी * मंत्री नितेश राणेंची माहिती मुंबई : आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत धर्मांतर विरोधी विधेयकाला मंजूरी देण्यात आली असल्याची माहिती राज्याचे मंत्री नितेश राणे यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे. आता हे विधेयक लवकरच दोन्ही सभागृहात मांडलं जाईल आणि त्यानंतर या विधेयकाचं कायद्यात रूपांतर होईल. त्यामुळे आता महाराष्ट्रात धर्मांतर विरोधी कायदा लवकरच लागू होण्याची शक्यता आहे. “विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्ताने आम्ही सगळ्या जणांनी ठणकावून सांगितलं होतं की महाराष्ट्रात सक्षम असा धर्मांतर विरोधी कायदा म्हणजे लव्ह जिहाद विरोधी कायदा आमचं सरकार सत्तेत आल्यानंतर आम्ही आणू, असा शब्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला होता. आज मला मनापासून समाधान वाटत आहे की महाराष्ट्रात एक सक्षम धर्मांतर विरोधी कायदा कॅबिनेटमध्ये पास करण्यात आला आहे. ‘धर्म स्वतंत्र अधिनियम २०२६’ या अंतर्गत या विधेयकाला मंजुरी देण्यात आली आहे. आता लवकरच याचा जीआर निघेल”, असं मंत्री नितेश राणे यांनी म्हटलं आहे. “आता महाराष्ट्रात अतिशय सक्षम असा धर्मांतर विरोधी कायदा लागू होईल. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे मी मनापासून आभार मानतो. या बरोबरच हा कायदा लागू व्हावा यासाठी अनेक कार्यकर्त्यांनी, अनेक हिंदुत्ववादी संघटनांनी अनेक मोर्चे काढले होते. हा कायदा लागू व्हावा यासाठी अनेकांनी संघर्ष केला. आता लवकरच हा कायदा लागू होणार आहे”, असं मंत्री नितेश राणे यांनी म्हटलं आहे.

संबंधित बातम्या

Advertisement ADVERTISEMENT 300x475

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
Advertisement ADVERTISEMENT 300x475