जिल्हा

सितारवादन, नृत्य आणि गायनाने दुसरा दिवस मंत्रमुग्ध

सितारवादन, नृत्य आणि गायनाने दुसरा दिवस मंत्रमुग्ध
सितारवादन, नृत्य आणि गायनाने दुसरा दिवस मंत्रमुग्ध फोटो: ठाणे वैभव
संगीतभूषण पं. राम मराठे महोत्सव
ठाणे : नृत्याचा ठेका...मंत्रमुग्ध करणारे सूर आणि सितार वादातून निघणा-या थेट काळजाला भिडणा-या तानांनी संगीत भूषण पं राम मराठे महोत्सवाचा दुसरा दिवस रसिकांना वेगळाच आनंद देऊन गेला.
गडकरी रंगायतन येथे आयोजित महोत्सवात दुसऱ्या दिवशीचे पहिले पुष्प पद्मश्री पंडित राजेंद्र गंगाणी यांनी गुंफले. कार्यक्रमाची सुरुवात त्यांनी भगवान गणेश वंदनेने केली. त्यानंतर सादर केलेल्या एक ताल आणि तीन ताल या रचनांनी जयपूर घराण्याची गहनता व गंभीरता प्रभावीपणे प्रकट केली. त्यांना तबल्यावर फतेहसिंग गंगाणी यांनी, गायन व हार्मोनियमवर श्रीरंग टेंबे, सारंगीवर संदीप मिश्रा तर बासरीवर युवराज सोनार यांनी साथसंगत केली. ज्येष्ठ गायिका आरती अंकलीकर यांनी राग पूर्व कल्याण, तीन तालातील बंदिश, एक तालातील तराना तसेच पं. शंकर अभ्यंकर यांची राग पूर्व कल्याणमधील बंदिश सादर केली. आरती अंकलीकर यांना तबल्यावर रोहित देव यांनी तर हार्मोनियमवर  सिध्देश बिचोलकर यांनी सांथसंगत केली.
एटावा-इमदादखानी घराण्याच्या सातव्या पिढीचे प्रतिनिधी असलेल्या उस्ताद शाहीद परवेझ यांनी आपल्या अद्वितीय  सितारवादनाने ठाणेकर रसिकांच्या मनाचा ठाव घेतला. कार्यक्रमाची सुरूवात त्यांनी राग यमनमधील शांत आणि गंभीर आलापाने केली. त्यानंतर द्रुत गत तानांनी वादनाची ताकद, वेग आणि नजाकत यांचा अप्रतिम संगम त्यांनी सादर करुन रसिकांची वाहवा मिळविली. त्यांना तबल्यावर उन्मेष बॅनर्जी यांनी साथसंगत केली.
संगीतभूषण पं. राम मराठे महोत्सवात प्रत्येक दिवशी भाग्यवान रसिक लकी ड्रॉ च्या माध्यमातून निवडला जातो. दुसऱ्या दिवशीच्या सत्रात श्रध्दा हर्डीकर, अशोक सरवटे हे भाग्यवान प्रेक्षक ठरले. त्यांना महापालिकेच्यावतीने भेटवस्तू व पुष्पगुच्छ देवून मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.

संबंधित बातम्या

Advertisement ADVERTISEMENT 300x475

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
Advertisement ADVERTISEMENT 300x475