GENERAL

अंकिताच्या स्वप्नांना विमानाच्या पंखांचे बळ

अंकिताच्या स्वप्नांना विमानाच्या पंखांचे बळ
अंकिताच्या स्वप्नांना विमानाच्या पंखांचे बळ फोटो: ठाणे वैभव

शालेय जीवनात असताना ‘मिशन उडान’ हा कार्यक्रम पाहताना वैमानिक होण्याचे स्वप्न त्यांनी पाहिले. मात्र, वडिलांना तिने डॉक्टर व्हावे असे वाटत होते. दोन वर्षे वडिलांची समजूत काढल्यानंतर, त्यांनी तिला अमेरिकेत विमानचालन प्रशिक्षणासाठी जाण्याची परवानगी दिली. यासाठी वडिलांनी २५ लाख रुपयांचे कर्ज घेतले. अमेरिकेत प्रशिक्षण घेत असतानाच २००९-१० मध्ये आर्थिक मंदी आली. त्यावेळी अंकिता यांच्याकडे कमर्शियल पायलट लायसन्स (CPL) होते, पण नोकरी नव्हती. त्याकाळी भारतातही संधी मिळत नव्हती. मात्र, वैमानिक होण्याचे स्वप्न पूर्ण करण्याच्या दिशेने एक पाऊल म्हणून त्यांनी बी.एससी. एव्हिएशनचे शिक्षण घेण्यास सुरुवात केली. कितीही प्रयत्न केले तरीही उड्डाण क्षेत्रात नोकरी मिळत नव्हती. म्हणून अंकिता यांनी ‘टीच इंडिया’ उपक्रमात गरीब आणि होतकरू मुलांना शिक्षण देण्यास सुरुवात केली. त्याचदरम्यान घरून लग्नासाठी दबाव वाढत होता. मात्र अंकिता यांच्या मनात अजूनही वैमानिक होण्याची जिद्द होती. विमानचालक क्षेत्रात लवकर प्रवेश केला नाही तर परवाना रद्द होईल हे लक्षात आल्यावर अंकिता यांनी पुन्हा एकदा प्रयत्न करण्याचे ठरवले. त्यानंतर पुन्हा हवाई क्षेत्रात नोकरीसाठी त्यांनी प्रयत्न सुरू केले. अखेर एअरलाईन्समध्ये ग्राउंड हँडलिंगसाठी ‘AOCS’ विभागात त्यांना नोकरी मिळाली. येथे विमानतळावरील कामे करावी लागली – सामान चढवणे, प्रवाशांची मदत करणे आणि विविध तांत्रिक जबाबदाऱ्या पार पाडणे. AOCS पूर्वी त्यांनी एक वर्ष जेट एअरवेजमध्ये केबिन क्रू म्हणून काम केले. ही नोकरी करत असतानाच त्यांचा वैमानिक परवाना नूतनीकरणासाठी अभ्यास सुरू झाला. एअरलाईन्समध्येच अंतर्गत वैमानिक परीक्षा घेण्यात आली आणि ती परीक्षा यशस्वीरित्या उत्तीर्ण केली. आज त्या एअरलाईन्समध्ये वैमानिक म्हणून कार्यरत आहेत आणि आपल्या स्वप्नांना मूर्त रूप देत आहेत. अंकिता धनवडे या ठाण्यातील एक प्रतिभावान महिला पायलट आहेत. त्यांनी आपल्या कठोर परिश्रम, समर्पण आणि दृढनिश्चयाच्या माध्यमातून अनेक अडचणींवर मात करून यश मिळवले. आर्थिक संकटे, कौटुंबिक जबाबदाऱ्या आणि सामाजिक अडचणींवर मात करून त्यांनी यश प्राप्त केले आहे. अंकिता धनवडे यांचा प्रवास भारतीय विमानचालक क्षेत्रातील एक प्रेरणादायी कथा आहे, जी इतर महिलांना आपल्या स्वप्नांच्या पूर्ततेसाठी प्रेरणा देते.

संबंधित बातम्या

Advertisement ADVERTISEMENT 300x475

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
Advertisement ADVERTISEMENT 300x475