जिल्हा

पुलावरून फेकलेल्या कृष्णासाठी सिव्हिल रुग्णालय ठरले देवदूत

पुलावरून फेकलेल्या कृष्णासाठी सिव्हिल रुग्णालय ठरले देवदूत
पुलावरून फेकलेल्या कृष्णासाठी सिव्हिल रुग्णालय ठरले देवदूत फोटो: ठाणे वैभव
ठाणे: आपल्या आजोळी पायी जाणाऱ्या एका मुलाला काही नशेबाज अज्ञात इसमांनी पुलावरून खाली फेकले. गंभीररित्या जखमी झालेल्या मुलाच्या दोन्ही पायाच्या घोट्यांची हाडे तुटली होती. त्याला उपचारासाठी सिव्हिल रुग्णालयात आणल्यावर घोट्यांची जोखमीची यशस्वी शस्त्रक्रिया पार पडली आहे. खर्डी रेल्वे स्टेशनजवळच्या गावात राहणारा कृष्णा मुकणे (१५) आपल्या आजीकडे चालत संध्याकाळच्या सुमारास जात होता. समृद्धी महामार्ग येथील पुलावरून जातेवेळी नशेत असलेल्या काही अज्ञात व्यक्तींनी दरम्यानच्या वेळेत कोणते कारण नसताना कृष्णाला उचलले आणि पुलावरून खाली फेकले. मात्र खाली पडून कृष्णा जबर जखमी झाला होता. त्याला उठताही येत नव्हते. जवळच काही कामगार काम करत होते. त्यांनी कृष्णाची माहिती घेऊन कुटुंबियांना कळवले. दोन्ही पायांच्या घोट्याला मार बसल्यामुळे त्याला तत्काळ ठाणे सिव्हिल रुग्णालयात दाखल केले. कृष्णाच्या दोन्ही पायांचे एक्सरे काढल्यावर घोट्यांची हाडे मोडल्याचे समजले. सिव्हिल रुग्णालयात गेल्या काही वर्षात गुंतागुंतीच्या जोखमीच्या शस्त्रक्रिया यशस्वी होत आहेत. मात्र कृष्णाची काहीशी आव्हानात्मक शस्त्रक्रिया होती. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. कैलास पवार, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. धीरज महांगडे यांच्या मार्गदर्शनाखाली शस्त्रक्रिया करण्यात आली. १५ दिवसांत कृष्णाच्या दोन्ही घोट्यांच्या एकूण तीन शस्त्रक्रिया यशस्वी झाल्या आहेत. एका पायाला जखम असल्याने एक शस्त्रक्रिया विलंबाने करावी लागली होती. या शस्त्रक्रियेसाठी अस्थितज्ज्ञ डॉ. विलास साळवे, डॉ. अजित भुसागरे, डॉ.मयूर नागरगोजे, डॉ.दीपेश पाटील, भूलतज्ञ डॉ.रुपाली यादव, परिचारिका गायकर, पाटील, राणे, भक्ती,आणि कर्मचारी ठाकरे मामा, मिलिंद मामा, मदन मामा, नितीन मामा यांनी अथक परिश्रम घेतले. अज्ञात व्यक्तींनी आमच्या कृष्णाला पुलावरून खाली फेकले. जखमी अवस्थेत बघितल्यावर आम्ही सर्वच घाबरलो. परंतु सिव्हिल रुग्णालयाने कृष्णावर जे उपचार केले यासाठी त्यांचे आभार मानावे तितके कमीच आहेत, अशा भावना मुलाचे वडील दिलीप मुकणे यांनी व्यक्त केल्या. कृष्णाच्या शस्त्रक्रियेसाठी खाजगी रुग्णालयात मोठा खर्च आला असता. परंतु सिव्हिल रुग्णालयातील डॉक्टर आणि कर्मचारी वर्ग रुग्णांसाठी नेहमीच देवदूत होऊन काम करत आहेत. शस्त्रक्रियेसाठी रुग्णालयात अत्याधुनिक उपकरणे ठेवण्यात आली आहेत. त्यामुळे खाजगी रुग्णालयात होणाऱ्या जोखमीच्या शस्त्रक्रियाही सिव्हील रुग्णालयात होतात, असे डॉ. कैलास पवार यांनी सांगितले.

संबंधित बातम्या

Advertisement ADVERTISEMENT 300x475

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
Advertisement ADVERTISEMENT 300x475