जिल्हा

आनंदीबाई जोशी प्रसूतिगृहाचे होणार रुग्णालयात रूपांतर

आनंदीबाई जोशी प्रसूतिगृहाचे होणार रुग्णालयात रूपांतर
आनंदीबाई जोशी प्रसूतिगृहाचे होणार रुग्णालयात रूपांतर फोटो: ठाणे वैभव
राज्य शासनाकडून २२ कोटींचा निधी ठाणे : वर्तकनगर भागातील बंद असलेल्या आनंदीबाई जोशी रुग्णालयामुळे या भागातील वाढत्या लोकसंख्येच्या प्रमाणात प्रसूती गृह नसल्याने या भागातील गरीब नागरिकांना ठाणे महापालिकेच्या कळवा किंवा इतर रुग्णालयात जावे लागते. त्यामुळे गरोदर महिलांची ससेहोलपट होते. ही फरफट आता कमी होणार असून आनंदीबाई जोशी प्रसुतीगृहाचे नूतनीकरण करून त्याचे १०० खाटांच्या रुग्णालयात रुपांतर केले जाणार आहे. २०१७ मध्ये या प्रसुतीगृहाला आग लागली होती. तेव्हापासून हे प्रसुतीगृह बंदावस्थेत होते. या ठिकाणी आता १०० खाटांचे रुग्णालय उभारण्यात येणार असून त्यासाठी २२ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. ठाणे महापालिका क्षेत्राची लोकसंख्या वाढली आहे. कळवा येथे ठाणे महापालिकेचे छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय असून या रुग्णालयात प्रसुतीसाठी मोठ्या प्रमाणात महिला दाखल होतात. २०१७ मध्ये वर्तकनगर येथील आनंदीबाई प्रसुतीगृहाला आग लागली होती. त्यानंतर हे प्रसुतीगृह बंदावस्थेत होते. परंतु त्याचे कामकाज कोरस परिसरात सुरु होते. याठिकाणी दर महिन्याला ६० ते ७० प्रसुती होत आहेत. या प्रसुतीगृहाचे पुर्नबांधणीचे काम हाती घेण्यात आले आहे. त्यानुसार पहिल्या टप्प्यात तळ अधिक तीन मजल्यापर्यंत, दुसऱ्या टप्यात चौथ्या आणि पाचव्या मजल्यापर्यंत, तिसऱ्या टप्प्यात सहा ते आठ मजल्यांचे बांधकाम करण्यात येणार असल्याची माहिती महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली. या रुग्णालयाच्या कामासाठी राज्य शासनाकडून २२ कोटी ५० लाख रुपयांचा निधी मंजुर करण्यात आला आहे.

संबंधित बातम्या

Advertisement ADVERTISEMENT 300x475

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
Advertisement ADVERTISEMENT 300x475