जिल्हा

दैनिक पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी 'ठाणेवैभव'चे आनंद कांबळे

दैनिक पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी 'ठाणेवैभव'चे आनंद कांबळे
दैनिक पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी 'ठाणेवैभव'चे आनंद कांबळे फोटो: ठाणे वैभव
ठाणे: ठाणे शहर दैनिक पत्रकार संघाच्या रविवारी झालेल्या चुरशीच्या निवडणुकीत आनंद कांबळे यांचा विजय झाला आहे. अध्यक्षपदासाठी झालेल्या निवडणुकीत आनंद कांबळे आणि दिलीप शिंदे यांना प्रत्येकी ४४ मते मिळाल्याने चिठ्ठी टाकण्यात आली. त्यात कांबळे यांचे नाव आल्याने त्यांची एक वर्षासाठी निवड झाली. पुढच्या वर्षी हे पद दिलीप शिंदे यांना मिळणार आहे. ठाणे महापालिकेच्या नरेंद्र बल्लाळ सभागृहत झालेल्या या निवडणुकीचे निवडणूक अधिकारी म्हणून महेश राजदेरकर आणि रवींद्र मांजरेकर होते. अध्यक्ष पदाच्या निवडणुकीत आनंद कांबळे आणि दिलीप शिंदे यांना प्रत्येकी ४४ मते मिळाली. दीपक दळवी यांना ३२, सुरेश साळवे यांना पाच मते मिळाली. कार्याध्यक्ष पदासाठी विकास काटे यांना ६० मते मिळून ते निवडून आले. विरोधक हेमा वाडकर यांना ४३, निलेश मंडलिक यांना २४ मते मिळाली. उपाध्यक्ष पदासाठी झालेल्या निवडणुकीत दीपक शेलार यांना ४२ मते मिळून ते विजयी झाले. अनिल शुक्ला यांना ४१ मते तर नितीन दूधसागर यांना ११ मते मिळाली. सरचिटणीस पदासाठी निलेश पानमंद यांची निवड झाली. त्यांना ६९ मते मिळाली. अतुल मळेकर यांना ५३ मते मिळाली. सह चिटणीस पदासाठी गणेश थोरात यांची निवड झाली. त्यांना ७७ मते मिळाली. सारिका साळुंखे यांना ४६ मते मिळाली. खजिनदारपदी विभव बिरवटकर बिनविरोध निवडून आले. सदस्य पदासाठी झालेल्या निवडणुकीत युनूस खान, प्रफुल्ल गांगुर्डे, अशोक गुप्ता, सचिन देशमाने, अमर राजभर, पंकज रोडेकर तर अनुपमा गुंडे यांची बिनविरोध निवड झाली.

संबंधित बातम्या

Advertisement ADVERTISEMENT 300x475

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
Advertisement ADVERTISEMENT 300x475