जिल्हा

आनंद चॅरिटेबल ट्रस्टच्या चैत्रोत्सवात मिरवणूक उत्साहात

आनंद चॅरिटेबल ट्रस्टच्या चैत्रोत्सवात मिरवणूक उत्साहात
आनंद चॅरिटेबल ट्रस्टच्या चैत्रोत्सवात मिरवणूक उत्साहात फोटो: ठाणे वैभव
ठाणे: हिंदू नववर्षाचे स्वागत आणि चैत्र वासंतिक नवरात्रोत्सवाचे औचित्य साधून आनंद चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने ठाण्यातील जांभळी नाका येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज मैदान येथे देवीचे मोठ्या जल्लोषात आणि चैतन्यपूर्ण वातावरणात आगमन झाले. पारंपरिक वाद्यांच्या गजरात आणि अलोट उत्साहात निघालेल्या या मिरवणुकीने संपूर्ण ठाणे शहर भक्तीमय झाले होते. मिरवणुकीत संपूर्ण ठाणे तसेच आळंदी, पंढरपूर येथून आलेले वारकरी पथक टाळ-मृदंगाच्या गजरात सहभागी झाले होते. मिरवणुकीत ३०० हून अधिक पथकांचा समावेश होता. महिला आणि पुरुषांच्या लेझीम पथकाने मिरवणुकीत रंगत आणली. तसेच, डोक्यावर तुळशी वृंदावन घेऊन चालणाऱ्या महिला भाविकांचे विशेष कौतुक होत होते. मिरवणुकीत घोडेस्वार आणि मावळ्यांच्या वेशभूषेतील युवक-युवतींनी महाराष्ट्राच्या गौरवशाली इतिहासाची आठवण करून दिली. यावेळी शिवसेना नेते माजी खासदार राजन विचारे, संपर्कप्रमुख नरेश मणेरा, जिल्हाप्रमुख केदार दिघे, उपजिल्हाप्रमुख प्रदीप शिंदे, सुनील पाटील, शहर प्रमुख अनिश गाढवे, समन्वयक संजय तरे, महिला जिल्हा संघटिका रेखा खोपकर आदी सहभागी झाले होते.

संबंधित बातम्या

Advertisement ADVERTISEMENT 300x475

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
Advertisement ADVERTISEMENT 300x475