जिल्हा
चोरट्यामुळे एक्सप्रेस प्रवाशाला गमवावा लागला पाय
चोरट्यामुळे एक्सप्रेस प्रवाशाला गमवावा लागला पाय
फोटो: ठाणे वैभव
कल्याण: अल्पवयीन मुलाने मेल एक्सप्रेसच्या दारात उभ्या असलेल्या प्रवाशाला फटका मारून मोबाईल हिसकावला. यामुळे प्रवासी खाली पडल्याने त्याच्या दोन्ही पायाला गंभीर दुखापत झाली आहे. त्याने एक पाय गमावल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. आंबिवली आणि शहाड रेल्वे स्थानकादरम्यान ही धक्कादायक घटना घडली आहे.
चोरटा एवढ्यावरच थांबला नाही, तर जखमी अवस्थेत असलेल्या या प्रवाशाचे 20 हजार देखील लुटले आहेत. जखमी प्रवाशाचे नाव गौरव निकम असून कल्याण रेल्वे पोलिसांनी गुन्हा दाखल करत अवघ्या काही तासात अल्पवयीन इराणी चोरट्याला अटक केली आहे.
अल्पवयीन मुलाविरोधात या आधी देखील चार ते पाच गुन्हे दाखल असल्याचे पोलिसांनी सांगितले असून या प्रकरणाचा कल्याण रेल्वे पोलिसांकडून तपास सुरू आहे.
ADVERTISEMENT 300x475
ADVERTISEMENT 300x475