महाराष्ट्र

बदलापूरच्या अत्याचारी अक्षय शिंदेचा एन्काऊंटर

बदलापूरच्या अत्याचारी अक्षय शिंदेचा एन्काऊंटर
बदलापूरच्या अत्याचारी अक्षय शिंदेचा एन्काऊंटर फोटो: ठाणे वैभव
* आरोपीने पोलिसांवर दोन गोळ्या झाडल्या, एक अधिकारी जखमी बदलापूर : महाराष्ट्रासह संपूर्ण देशात संतापाची लाट निर्माण करणाऱ्या बदलापूर येथील शाळेतील दोन लहानग्या मुलींच्या अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे हा पोलिसांनी स्वसंरक्षणासाठी केलेल्या गोळीबारात ठार झाला. तुरुंगातून पोलिस कोठडी नेण्यात येत असताना त्याने पोलिसांकडून बंदूक हिसकावून गोळीबार केला. यात एक पोलिस अधिकारी जखमी झाला. पोलिसांनी स्वसंरक्षणासाठी केलेल्या गोळीबारात अक्षय जखमी झाला. त्यानंतर त्याला तातडीने कळवा रुग्णालयात नेण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषीत केले. ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत घडलेल्या या प्रकरणानंतर राजकीय प्रतिक्रिया देखील येत आहे. उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या घटनेची तातडीने चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. फडणवीस यांनी अक्षय शिंदेचा मृत्यू झाल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. बदलापूर घटनेनंतर चौकशीत अक्षय शिंदेने अन्य दोन गुन्हे दाखल करण्यात आले होते. यापैकी एका गुन्ह्यात न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी दिली होती. त्यानुसार बदलापूर पोलीस त्याचा ताबा घेण्यासाठी तळोजा तुरुंगात गेले होते. अक्षय शिंदेला तुरुंगातून ताब्यात घेऊन जात असताना त्याने शेजारी बसलेल्या पोलिस अधिकाऱ्याची बंदुक हिसकावून घेतली आणि स्वत:वर गोळी झाडून घेतली. त्याला रोखण्याचा प्रयत्न करत असताना सहायक पोलिस निरीक्षक निलेश मोरे हे देखील गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर ज्युपिटर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. कोर्टाकडून कोठडी मिळाल्यानंतर बदलापूर पोलीस अक्षय शिंदे याला ताब्यात घेण्यासाठी तळोजा तुरुंगात गेले. संध्याकाळी साडेपाचच्या सुमारास पोलीस त्याला तुरुंगातून घेऊन निघाले. साडेसहाच्या सुमारास मुंब्रा येथे आले असता अक्षयने शेजारी बसलेल्या पोलिस अधिकाऱ्याकडील बंदुक हिसकावून घेतली आणि दोन गोळ्या झाडल्या. यात निलेश मोरे हे जखमी झाले. यावर पोलिसांनी स्वसंरक्षणासाठी तीन गोळ्या झाडल्या आणि यात अक्षय जखमी झाला. त्याच्या डोक्याला गोळी लागल्याचे समजते. या घटनेनंतर पोलिसांनी अक्षय शिंदेसह जखमी पोलीस अधिकारी यांना तातडीने कळवा येथील रुग्णालयात नेले. अक्षय शिंदेच्या मृत्यूनंतर विरोधकांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे. ही बनावट चकमक असल्याचे टीका पृथ्वीराज चव्हाण, सुषमा अंधारे यांनी केली आहे. या आरोपीला फाशी देण्याची मागणी करणारे विरोधक पोलिसांनी स्वसंरक्षणासाठी गोळ्या झाडल्या म्हणून आरोपीची बाजू घेत असून ते निंदनीय आहे असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून त्याला मरेपर्यंत फाशी देण्यात यायला हवी होती, परंतु शाळा प्रशासनाला वाचवण्यासाठी हे एन्काऊंटर करण्यात आले आहे, त्याची सखोल चौकशी करण्यात यावी, अशी मागणी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे.

संबंधित बातम्या

Advertisement ADVERTISEMENT 300x475

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
Advertisement ADVERTISEMENT 300x475